
नाशिक : वारकरी, भाविकांना विठ्ठल दर्शनाची ओढ लागलेली आहे. अशात आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi) पंढरपूर दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते. जिल्हास्तरावरून पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी, भाविकांच्या सेवेत लालपरी धावणार आहे. एसटी महामंडळाच्या (MSRTC) नाशिक विभागातर्फे ७ ते १४ जुलै या कालावधीत पंढरपूरसाठी २६० जादा बसगाड्या सोडल्या जाणार आहेत. (MSRTC 260 extra buses for ashadhi ekadashi from 6 July Nashik News)
विविध आगारांतील यात्रा केंद्रातून या बसगाड्या सुटतील. कोरोना महामारीचा प्रादुर्भावामुळे यापूर्वी वारी प्रभावित झालेली होती. अशात या वर्षी वारकरी, भाविकांमध्ये उत्साह बघायला मिळतो आहे. १० जुलैला आषाढी एकादशी असल्याने या दरम्यानच्या कालावधीत वारकरी, भाविक दर्शनासाठी पंढरपूरला दाखल होत असतात. या भाविकांच्या सुविधेसाठी जादा बस उपलब्ध असणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागातर्फे ६ जुलैपासून जिल्हापातळीवरून २६० जादा बसगाड्या सोडल्या जातील. पंढरपूरसाठी सोडल्या जाणाऱ्या या बसगाड्या १४ जुलैपर्यंत भाविक प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध राहतील.
या केंद्रांवरून जादा बसगाड्या
आगार यात्रा केंद्र/बसस्थानके
नाशिक महामार्ग बसस्थानक
मालेगाव मालेगाव नवीन बसस्थानक, रावळगाव
सटाणा नामपुर, देवळा, ताहाराबाद, सटाणा
मनमाड मनमाड, चांदवड
सिन्नर सिन्नर, वावी
लासलगाव लासलगाव, विंचूर, निफाड, चांदोरी
नांदगाव नांदगाव
इगतपुरी इगतपुरी, घोटी
येवला येवला
कळवण कळवण, वणी
पेठ पेठ
पिंपळगाव (बं) पिंपळगाव, ओझर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.