Nashik : मुलतानपुरा रुग्णालयाला सुरू होण्याची प्रतीक्षा

Multanpura hospital latest marathi news
Multanpura hospital latest marathi newsesakal

जुने नाशिक : मुलतानपुरा रुग्णालय इमारत तयार होऊन सुमारे तीन वर्ष झाले आहे. तर रुग्णालयाचे सय्यदानी माँजी साहेबा रुग्णालयात (प्रसूतिगृह) नामकरण करत उद्‌घाटन करून १५ ऑगस्टला एक वर्ष होत आहे. तरी अद्याप रुग्णालय सुरू झालेले नाही. त्यामुळे जुने नाशिकमधील रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे. (Multanpura hospital waiting for opening Nashik Latest Marathi News)

महापालिकेतर्फे मुलतानपूरा येथे सय्यदानी माँजी साहेबा रुग्णालयात (प्रसूतिगृह) उभारले आहे. अनेक वर्षापासून रुग्णालयाची इमारत धूळखात पडली होती. १५ ऑगस्ट २०२१ ला माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते रुग्णालयाचे उद्‌घाटन झाले.

रुग्णालय सुरू होणार अपेक्षेने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मात्र, हा आनंद क्षणभंगुर ठरला. उद्‌घाटनास वर्ष उलटले आहे तरीही रुग्णालय सुरू झालेले नाही. परिसरातील नागरिकांसह अन्य विविध भागातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

विशेषतः प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना. गेली दोन वर्ष डॉ. झाकिर हुसैन रुग्णालय कोविड सेंटर केल्याने प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना जिजामाता रुग्णालयात पाठविले जात. ते रुग्णालयदेखील अपुरे पडत असल्याने कर्मचारी इंदिरा गांधी रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला देतात.

सध्या काही महिन्यांपासून पुन्हा डॉ. झाकिर हुसैन रुग्णालय कोविड सेंटर केले आहे. त्यामुळे पुन्हा महिलांना प्रसूतीसाठी जिजामाता आणि इंदिरा गांधी रुग्णालयाचे दरवाजे ठोठावे लागत आहे. काही महिला तर रस्त्यातच प्रसूत झाल्याची घटना घडल्या आहे. असे प्रकार टाळण्यासाठी मुलतानपुरातील रुग्णालय सुरू होणे गरजेचे आहे.

Multanpura hospital latest marathi news
Nashik : इंद्रनगरीमधील सभागृहाची तोडफोड

आधुनिक यंत्रे धुळखात पडून

डब्ल्यूएचओच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून आधुनिक एक्स- रे मशीनसह अन्य वस्तूंचा पुरवठा रुग्णालयात करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र रुग्णालय सुरू होत नसल्याने मशिनरी धूळ खात पडून आहे. वापराविना मशिनरीची देखभाल दुरुस्तीदेखील झालेली नाही.

त्यामुळे प्रत्यक्षात रुग्णालय सुरू झाल्यावर ती मशिनरी वारंवार नादुरुस्त होण्याची शक्यता आहे. दरम्यान, रुग्णालय त्वरित सुरू करावे, या मागणीचे निवेदन छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडतर्फे अतिरिक्त आयुक्त श्री. खाडे यांना देण्यात आले.

आठ दिवसात रुग्णालय सुरू झाले नाही तर आंदोलनाचा इशारा ब्रिगेडचे अध्यक्ष अजीज पठाण यांनी दिला. या वेळी मुस्ताक नेता, इब्राहिम अत्तर, मुख्तार शेख, माजीद पठाण, फरीद शेख, आवेश शेख आदी उपस्थित होते.

Multanpura hospital latest marathi news
मंत्र्यांचे भाषण सुरू अन् विद्यार्थी भिजले पावसात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com