
गोदावरी घाटावर तिप्पट सुरक्षा
नाशिक : महापालिकेतर्फे (NMC) शहरात विविध भागांमध्ये अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविताना गोदावरी घाटावर महापालिका प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित करीत सुरक्षा व्यवस्थेत तीनपट वाढ केली आहे. (Municipal Administration increased security at Godavari Ghat Due to encroachment)
गोदावरी घाटावर पूजा साहित्य विक्री करणाऱ्या व्यतिरिक्त अतिक्रमण झाल्यास थेट सुरक्षारक्षकांना जबाबदार धरण्यात येणार आहे. त्यामुळे गोदावरी घाटाचा परिसर अतिक्रमणमुक्त झाल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा: रामसेतूने कित्येक वर्षांत प्रथमच घेतला मोकळा श्वास
महापालिकाआयुक्त (NMC Commissioner) तथा प्रशासक रमेश पवार यांनी गंगाघाट परिसर अतिक्रमणमुक्त करण्याचा संकल्प घेतला आहे. यामुळे त्यांनी वेळोवेळी या ठिकाणी पाहणी दौरा करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. विविध भागांमध्ये हॉकर्स, टपरीधारक अतिक्रमण धारकांवर मोठ्या प्रमाणात कारवाईच्या सूचना आहेत. गोदावरी घाटावर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करून सुमारे शंभर लहान- मोठ्या टपऱ्या, हातगाड्या तसेच रस्त्यावर बसणाऱ्याचे साहित्य जप्त केले आहे.
हेही वाचा: नांदेड : अवैध वाळू उपसाविरोधात कारवाई
Web Title: Municipal Administration Increased Security At Godavari Ghat Due To Encroachment Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..