जाहिरात फलक अंतराबाबत लवकरच धोरण

Hording Of Advertising
Hording Of Advertisingesakal

नाशिक : दर पाच फुटावर प्रायोजकांनी सुचविलेले जाहिरात फलक लावण्यासाठी साधारण २० मीटर अंतरावर फलक लावण्याचे महापालिका प्रशासनाच्या विचाराधीन आहे. त्यासाठी लवकरच धोरण ठरणार आहे. सध्याच्या जाहिरात फलक लावण्याच्या धोरणात कुठेही एकवाक्यता नाही. ‘जसा प्रायोजक तसे धोरण’ या न्यायाने सौंदर्यीकरण कमी आणि विद्रूपीकरणच जास्त दिसत असल्याने महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी जाहिरात फलक लावण्याचे धोरण ठरविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शहर सुशोभीकरणासाठी प्रायोजकांच्या मदतीने महापालिकेकडून चौकासह रस्ता दुभाजकांत जाहिराती केल्या जातात. मात्र, त्यात शहरभर फिरताना कुठेही एकवाक्यता दिसत नाही. नेमकी हीच बाब हेरून महापालिका आयुक्तांनी मागील महिन्यांपासून चौक आणि रस्ता दुभाजक सौंदर्यीकरणासाठी धोरण ठरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात जुन्या करारांची पडताळणी करीत अनेक ठेकेदारांना नोटिसा बजावून रस्ता दुभाजकाचे सुशोभीकरण करण्यात आले. काहींना दंडही केला गेला. एकूणच मरगळ झटकून सौंदर्यीकरणाचे चांगले परिणाम मिळविण्यासाठी महापालिका यंत्रणा कामाला लागली आहे. आयुक्तांच्या दणक्यानंतर शहरातील वाहतूक बेट आणि दुभाजकांची रंगरंगोटी सुरू झाली आहे. अनेक चौकाचा लुक बदलू लागला आहे.

तक्रारी आल्याने विषय रडारवर

असे असतानाही शहरात अनेक चौकात किंवा रस्ता दुभाजकांवर महापालिकेने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे जाहिरात फलक लावले जात नसल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले आहे. किमान काही अंतर सोडून जाहिरातीचे फलक लावणे अपेक्षित असताना अनेक मार्गावर फुटावर दोन, दोन फुटावर जाहिरात लावून शहर विद्रूपीकरण केले गेल्याने याबाबत जाहिरात फलक किती अंतरावर लावावेत. त्या फलकांचे आकारमान काय असावे, याविषयी महापालिका धोरण ठरविणार आहे. त्यानुसारच प्रायोजकांना जाहिरातीचे फलक लावावे लागणार आहे. त्र्यंबक नाका ते गडकरी चौकापर्यंत काम करणाऱ्या प्रायोजकांनी जाहिरात २० फुटावर लावायला हव्या होत्या. परंतु, त्या ५ फुटावर जाहिराती असल्याने सौंदर्यात भर पडण्याऐवजी विद्रूपीकरणच जास्त दिसत असल्याच्या तक्रारी आल्याने आयुक्तांनी हा विषय रडारवर घेतला आहे.

सुशोभीकरणाची कामे सुरू

महापालिकेने आगामी काळात शहरातील १३२ चौकांचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक दायित्व निधीतून चौकांचे सुशोभीकरणाची कामे सुरु झाली आहे. त्यामुळे अनेक चौकाना झळाळी येऊ लागली आहे. शहरातील सीबीएस, शालिमार येथील इंदिरा गांधी चौक, रविवार कारंजा, लेले हॉस्पिटल, गजपंथ, गोविंदनगर, कॅनडा कॉर्नर, मंगल कार्यालय, अशोक स्तंभ ते मुंबई नाका, अमरधाम रोड, रेल्वे स्थानक चौक, शालीमार चौक बाबा बंगला, पंपिंग स्टेशन, रविवार कारंजा आदी चौकांच्या सुशोभीकरणाची कामे सुरू झाली आहेत.

Hording Of Advertising
भूमाफियांकडून महापालिकेला करोडोंचा चुना

दंडात्मक कारवाया

जाहिरात फलक लावण्याच्या धोरणानुसार जे प्रायोजक जाहिरात फलक लावणार नाही, अशा प्रायोजकांना महापालिका प्रशासनाकडून समज दिली जाणार आहे. त्यानंतरही जे ऐकणार नाही, अशांवर थेट कारवाई केली जाणार आहेत. महापालिका आयुक्तांनी यासंदर्भात संबंधित विभागांना तशा सूचना दिल्या आहेत. विभागीय अधिकारी, विविध कर विभाग, तसेच बांधकाम विभाग अशा तीन विभागांतील अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे शहरातील या विद्रूपीकरणावर लक्ष ठेवायचे आहेत.

Hording Of Advertising
जागतिक अन्नसुरक्षा दिनविशेष : 'जेवणासोबत पुस्तकांची मेजवानीची'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com