Nashik Corona update : कोरोनाबळींच्या आकडेवारीत महापालिकेची दडवादडवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nashik Corona
नाशिक : कोरोनाबळींच्या आकडेवारीत महापालिकेची दडवादडवी

नाशिक : कोरोनाबळींच्या आकडेवारीत महापालिकेची दडवादडवी

नाशिक : कोरोनामुळे (Corona)मृत झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपये अनुदान देण्यासाठी महापालिकेकडून तब्बल सहा हजार आठशे अर्ज मंजूर करण्यात आले. मात्र यातून महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून (Municipal Medical Department) मृतांच्या आकडेवारीच्या दडवादडवीचा संशय येत आहे. यापूर्वी चार हजार ३३ मृत्यूची नोंद असताना सहा हजार ८०० अर्ज मंजूर कसे केले, असा सवाल उपस्थित होत आहे.

हेही वाचा: प्रजासत्ताक दिनी PM मोदींना धोका, सुरक्षा यंत्रणांना 'हायअलर्ट'

कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० हजार रुपये अनुदान मदतरूपाने देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यानुसार कोरोना मृतांच्या नातेवाइकांनी महापालिकेकडून अर्ज मागविण्यात आले होते. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फतदेखील अर्ज मागविण्यात आले होते. जिल्ह्यात आठ हजार ७७० रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये महापालिका क्षेत्रात चार हजार ३३, नाशिक ग्रामीण क्षेत्रात चार हजार २५३, मालेगाव महापालिका क्षेत्रात ३५८ व जिल्हाबाहेरील १२६ मृतांचा समावेश आहे. नाशिक महापालिका क्षेत्रामध्ये चार हजार ३३ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला असताना तेवढ्याच प्रमाणात अर्ज दाखल होणे अपेक्षित होते. मात्र त्यापेक्षा जास्त म्हणजे आठ हजार अर्ज महापालिकेकडे प्राप्त झाले. त्यातील चौदाशे अर्ज नामंजूर करण्यात आले.

हेही वाचा: नाना पटोलेंना अटक करा, गडकरी आक्रमक

आकडेवारीवरून संशय

महापालिका हद्दीत चार हजार ३३ मृत्यू झालेले असताना महापालिकेकडून सहा हजार ८०० अर्ज मंजूर करण्यात आले. त्यामुळे नेमका यापूर्वी जाहीर करण्यात आलेला आकडा खरा की मृतांचे मंजूर करण्यात आलेले अर्ज खरे, यावरून संभ्रम निर्माण झाला असून, अनुदान मिळविण्यासाठी नातेवाइकांचा खटाटोप तर नाही ना, असाही संशय व्यक्त होत आहे.(Nashik News)