esakal | Nashik : कोरोनाच्या नावाखाली होऊ द्या खर्च! मनपाची कोटीच्या कोटी उड्डाणे
sakal

बोलून बातमी शोधा

nashik-municipal-corporation

कोरोनाच्या नावाखाली होऊ द्या खर्च! मनपाची कोटीच्या कोटी उड्डाणे

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : गेल्या पावणेदोन वर्षांपासून कोरोनाचा सामना करीत असताना महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून कोटीच्या कोटी उड्डाणे घेण्यात आली आहे. आतापर्यंत साठ कोटींवर खर्च करण्यात आला असून, कोरोना प्रतिबंधक चाचण्यांवर साडेचौदा कोटी रुपये खर्च झाले आहे.


गेल्या वर्षाच्या एप्रिल महिन्यात शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर महापालिकेने उपाययोजना आखल्या. आपत्कालीन व्यवस्था म्हणून आयुक्तांना अधिकार देण्यात आले. प्रशासकीय यंत्रणेने कोरोना या विषयाकडे लक्ष केंद्रित करताना वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी खर्चात कुठलीच काटकसर सोडली नाही. संसर्ग रोखण्यासाठी समाजकल्याण, ठक्कर डोम, मेरी, तपोवन येथे कोविड सेंटर उभारण्यात आले. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी रॅपिड ॲन्टिजेन टेस्टचे प्रमाण वाढविण्यात आले. त्यानंतर आरटी- पीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आले. उपाययोजना करताना मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला. वैद्यकीय विभागाकडून ५९. २३ कोटी रुपये खर्च झाला. यात चाचण्यांवर १४. ५७ कोटी रुपये खर्च झाला. आता तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी नव्याने दोन लाख रॅपिड ॲन्टिजेन किट खरेदी केल्या जाणार आहे. कोरोना तपासण्या करण्यासाठी बिटको रुग्णालयात मॉलिकयुलर लॅब उभारण्यात आली. लॅबसाठी केमिकल किट व इतर साहित्य खरेदीसाठी ३. १८ कोटी रुपये, उपकरणे खरेदीवर २९. ९९ लाख, आरटी- पीसीआर चाचण्यांच्या साहित्यासाठी तीन लाख खर्च करण्यात आला.

हेही वाचा: अजित पवारांच्या नातेवाईकांवर कारवाई आकस बुद्धीने नाही : आठवले

मानधनावर १९. २८ कोटींचा खर्च

कोरोना रुग्णांची सख्या वाढत असल्याने वैद्यकीय विभागाकडे मनुष्यबळाची कमतरता होती. त्यामुळे कोविड सेंटरवर वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मानधनावर नियुक्ती करण्यात आली. त्यासाठी १९. २८ कोटी रुपये खर्च करण्यात आला. नगरसेवकांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसाठी ४.५५ कोटी रुपये, पीएसए प्लान्ट उभारण्यासाठी ४. ६८ कोटी, ड्युरा ऑक्सिजन सिलिंडरसाठी २८.५० लाख, रेमडेसिव्हिर, टोसिलीझुमॅब इंजेक्शन खरेदीसाठी तीन कोटी ८७ लाख, भोजन व इतर साहित्य खरेदीचा यात समावेश आहे.

हेही वाचा: विरोधकांच्या नातेवाईकांवर छापे टाकणे हा अतिरेक : छगन भुजबळ

loading image
go to top