Cycle Rally : स्वच्छ हवेसाठी सायकल रॅली, पथनाट्य; पर्यावरण रक्षणासाठी महापालिकेची मोहीम

Cycling
Cycling esakal

नाशिक : राष्ट्रीय स्वच्छ हवा प्रकल्पांतर्गत वायुप्रदूषणाचे परिणाम व समस्या कमी करण्यासाठी महापालिका महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व स्विस एजन्सी फॉर डेव्हलपमेंट ॲन्ड कार्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅली व पथनाट्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रदूषित १७ शहरांमध्ये नाशिकचा समावेश असल्याची बाब समोर आली. (Municipal Corporation organized bicycle rally campaign for environmental protection nashik news)

टेरी या संस्थेच्या फक्त एकच पृथ्वी आणि समन्वय शाश्वत सुसंवादात्मक जीवन पद्धती आणि निसर्ग या उपक्रमाअंतर्गत हा कार्यक्रम पार पडला. सायकल रॅलीत दीडशे सायकलस्वारांनी सहभाग घेतला. शहरातील दहा किलोमीटरच्या मार्गावर सायकल चालवत स्वच्छ पर्यावरणाचा संदेश दिला.

महापालिकेचे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी गोल क्लब मैदान येथे उपक्रमाला हिरवा झेंडा दाखविला. शहरांमध्ये कमी अंतर पार करण्यासाठी आपण सायकलचा वापर करू शकतो. शाश्वत जीवन ही आपली जबाबदारी आहे, याची जाणीवपूर्वक निवड करा. ज्यामुळे आपल्या पर्यावरणावरील प्रभाव कमी होईल, असे मार्गदर्शन मुंडे यांनी या वेळी केले.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

Cycling
Shiv Sena Meeting : शुभांगी पाटील यांच्यासाठी शिवसेनेची मुंबईहून कूमक

टेरीचे विधू कपूर म्हणाल्या, शाश्वत जीवन ही एक जीवनशैली आहे, जी एखाद्या व्यक्तीचा किंवा समाजाचा पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधन आणि वैयक्तिक संसाधनांचा वापर कमी करण्यासाठी प्रयत्न करते. आपण वाहतुकीच्या पद्धती ऊर्जा वापरामध्ये बदल करून कार्बन फुटप्रिंट कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

निरीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. तन्वीर अर्फिन म्हणाले, वायुप्रदूषण रोखण्यासाठी आपल्याला शाश्वत कृतींचा अवलंब करावा लागेल. डॉ. अंजू गोयल म्हणाल्या, वायू प्रदूषण हा एक पर्यावरणीय धोका आहे. जो वर्तमान आणि भावी पिढ्यांवर परिणाम करतो.

समस्येचा सामना करण्यासाठी सहयोगी कृती करण्याची आवश्यकता आहे. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर माने यांनी प्रत्येकाने वाहन व सायकलचा जास्तीत- जास्त वापर करण्याचे आवाहन केले.

Cycling
Shivputra Sambhaji Mahanatya : शिवपुत्र संभाजी महानाट्यासाठी जादा बस; जाणून घ्या वेळापत्रक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com