Municipal Election
sakal
नाशिक: काही वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा खाली बसला आहे. त्यामुळे आतापर्यंत राजकीय पक्षाकडून झालेले हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा, आरोप-प्रत्यारोप, एकमेकांवरील चिखलफेक व सरतेशेवटी शिक्षण व विकासाचे मुद्दे यात कोणाला व कशाला निवडायचे, याचा फैसला गुरुवारी (ता. १५) होणार आहे. त्यामुळे आता पुढील दोन दिवस मतदारांचे राहणार आहेत.