Nashik Municipal Election : नाशिक पालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; ६८.३४% नोंद, ४.६६ टक्क्यांची घट
Nashik Municipal Elections See 68.34% Voter Turnout : नाशिक जिल्ह्यातील अकरा पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीत ६८.३४ टक्के मतदान झाले असून, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मतमोजणीचा निकाल २१ डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. यामुळे ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूमबाहेर उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी कडक पहारा सुरू केला आहे.
नाशिक: जिल्ह्यातील अकरा पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीत ६८.३४ टक्के मतदान नोंदले गेले. २०१६-१७ मधील नऊ पालिकांमध्ये ७३ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे यंदा मतदानाचा टक्का ४.६६ टक्क्यांनी घसरल्याचे स्पष्ट झाले आहे.