Nashik Municipal Election : आज नाशिकमधील ११ नगरपालिकांसाठी मतदान! ३.७२ लाख मतदार बजावणार हक्क; ईव्हीएममध्ये बंद होणार उमेदवारांचे भविष्य
Overview of Nashik Municipal Elections 2025 : नाशिक जिल्ह्यातील ११ नगरपालिकांमधील थेट नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदांसाठी मतदानापूर्वी अधिकारी व कर्मचारी मतदान यंत्रणा व साहित्य घेऊन मतदान केंद्रांकडे रवाना झाले.
नाशिक: जिल्ह्यातील अकरा नगरपालिकांमधील थेट नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदांसाठी मंगळवारी (ता. २) सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे. जिल्ह्यातील एकूण ३,७२,५४३ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.