Fertilizer Project : खासगीकरणामुळे खत प्रकल्पावरील 84 पदे रद्द

Nashik Municipal Corporation News
Nashik Municipal Corporation Newsesakal

नाशिक : महापालिकेच्या खत प्रकल्पाचे खासगीकरण (Privatization) करण्यात आले असून, त्यामुळे खत प्रकल्पासाठी यापूर्वी भरण्यात आलेली ८४ पदेदेखील रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रिक्त २५ पदे तातडीने व्यपगत करण्यात आली आहेत. ५९ अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर ती पदे व्यपगत होणार आहे.(Municipal Fertilizer Project was privatized so decided to cancel 84 posts previously filled for Fertilizer Project Nashik news)

महासभेत यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यात मान्यता देण्यात आली. ऑक्टोंबर २००७ मध्ये शासन निर्णयानुसार खत प्रकल्पासाठी विविध संवर्गातील ८४ पदांना मान्यता देण्यात आली होती.

यात इलेक्ट्रीशियन तीन, सॉलिड वेस्ट टेक्नॉलॉजिस्ट, लिपिक, टायर फिटर असे प्रत्येकी एक, पोकलेन ऑपरेटर ७, डंपर, जेसीबी चालक १३, हैड्रोलिक मॅकेनिक २, मॅकेनिकल फिटर, प्लंबर ४, टायर फिटर १, सर्व्हिस स्टेशन ऑपरेटर ३ तर मजूर २४ असे एकूण ५९ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

Nashik Municipal Corporation News
Aditya Thackeray | एकदाच्या निवडणूका घेऊन दाखवाच; आदित्य ठाकरे यांचे बंडखोरांना आव्हान

२९ पदे रिक्त होती. महापालिकेने २०१६ पासून खत प्रकल्पाचे खासगीकरण केले. त्यामुळे अन्य विभागांच्या सेवा प्रवेश नियमावलींना मंजुरी देताना खतप्रकल्पावरील ८४ पदे व्यपगत करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

त्यानुसार कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)- १, इलेक्ट्रीशियन-४, वेल्डर- १, ऑटो इलेक्ट्रीशियन- २, स्टोअर कीपर लिपिक- २, सॉलिड वेस्ट टेक्नॉलॉजिस्ट- १, लिपिक, डेटा एन्ट्री ऑपरेटर-२,

पोकलेन ऑपरेटर बॉबकॅट चालक-८, डंपर, जेसीबी चालक (ऑपरेटर)- १४, जीप, टँकर, ट्रक, टॅक्टर ऑपरेटर-६, हैड्रोलिक मेकॅनिक-२, अ‍ॅटो मेकॅनिक-२, मेकॅनिकल फिटर, प्लंबर-४, टायर फिटर-२, सर्व्हिस स्टेशन ऑपरेटर-३, मजूर (मशिन शॉप)लोडर- ३० ही पदे रद्द करण्यात आली.

Nashik Municipal Corporation News
Onion Prices Fall : उन्हाळ पाठोपाठ लाल कांदाही गडगडला! लासलगावला मागणीपेक्षा पुरवठा अधिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com