
नाशिक : कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूनंतर पार्थिवावर अंत्यसंस्कार करताना होणारा विलंब लक्षात घेता महापालिकेतर्फे समन्वयासाठी हेल्पलाइन क्रमांक प्रसिद्ध केला आहे. दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे जनतेला आवाहन केले आहे.
या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन
जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यातच मृतांची एकूण संख्या ५४५ झाली आहे. कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूनंतर पार्थिवावर अंत्यसंस्कार करताना होणारा विलंब लक्षात घेता महापालिकेतर्फे समन्वयासाठी हेल्पलाइन क्रमांक प्रसिद्ध केला आहे. ०२५३-२३१७२९२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. त्याव्यतिरिक्त अमरधाम समन्वयक मेहबूब शेख- ८०८७९५१८७५ (दिवसपाळी) व संतोष गायकवाड- ९०२२०६९८२२ (रात्रपाळी) यांच्याशी, तसेच ९६०७४३२२३३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या क्रमांकावर नागरिकांना शववाहिका, तसेच विद्युत व गॅस शवदाहिनीच्या उपलब्धतेबाबत माहिती मिळेल. योग्य समन्वय होऊन तातडीने मृतांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणे गरजेचे असल्याने हेल्पलाइन क्रमांक देण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे.
संपादन - किशोरी वाघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.