esakal | धक्कादायक! रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईंकाकडून रुग्णालयाची तोडफोड....काय घडले नेमके? सीसीटिव्हीतून उघड
sakal

बोलून बातमी शोधा

cidco hospital marhan.jpg

खासगी रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू झाल्याने संतापलेले नातेवाईक व मित्रमंडळींनी रुग्णालयाची तोडफोड करून डॉक्टरला मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी (ता. ३) रात्री घडला. या संदर्भात अंबड पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्यात आलेला नव्हता. काय घडले नेमके?

धक्कादायक! रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईंकाकडून रुग्णालयाची तोडफोड....काय घडले नेमके? सीसीटिव्हीतून उघड

sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

नाशिक / सिडको : अंबड लिंक रोडवरील खासगी रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू झाल्याने संतापलेले नातेवाईक व मित्रमंडळींनी रुग्णालयाची तोडफोड करून डॉक्टरला मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी (ता. ३) रात्री घडला. या संदर्भात अंबड पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्यात आलेला नव्हता. काय घडले नेमके?

रुग्णाच्या मृत्यूनंतर सिडकोत रुग्णालयाची तोडफोड 

घटनास्थळ व पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार खासगी रुग्णालयात गेल्या तीन-चार दिवसांपासून एक रुग्ण उपचारासाठी दाखल होता. उपचार सुरू असताना सोमवारी तो दगावला. संबंधित रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह होता की निगेटिव्ह या संदर्भात माहिती मिळाली नाही. तसेच डिपॉझिट केलेले पैसेदेखील डॉक्टरांकडून परत मिळाले नाहीत. यावरून रुग्णालय प्रशासन व मृत रुग्णाच्या नातेवाइकांमध्ये सुरवातीला शाब्दिक वाद झाला. त्यानंतर डॉक्टरांशी चर्चेदरम्यान वादाचे पर्यवसान हाणामारीत व तोडफोडीत झाले.

हेही वाचा > अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना

डॉक्टरांना मारहाण; सीसीटीव्ही फुटेज पाहून तपास सुरू 

दरम्यान, या प्रकरणी रुग्णालयाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याच्या आरोपावरून मृताच्या संतापलेल्या नातेवाइकांनी संबंधित डॉक्टरास मारहाण करून रुग्णालयाची तोडफोड केल्याची घटनास्थळी चर्चा होती. मात्र, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला नव्हता. पोलिसांकडून तपास सुरू होता. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजची माहिती घेऊन त्यानुसार पोलिस तपास करीत असल्याचे सांगण्यात आले. 

हेही वाचा > सहा फुटांच्या खड्ड्यातून आली दुर्गंधी.. गावकऱ्यांना भलताच संशय....शोध घेताच गावात एकच खळबळ

रिपोर्ट - प्रमोद दंडगव्हाळ

संपादन - ज्योती देवरे