esakal | जेव्हा साधु महाराजांच्या कुटियाच्या आवारातच घडतो धक्कादायक प्रकार...पोलीसांनी केला खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

Murder 1

मंदिराच्या उत्तरेला असलेल्या कुटियातील साधू महाराजांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. या ठिकाणी वरिष्ठ पोलिस अधिकारी, श्वानपथक आणि फॉरेन्सिक लॅबचे कर्मचारी हजर झाले. ​त्यानंतर झाला खुलासा

जेव्हा साधु महाराजांच्या कुटियाच्या आवारातच घडतो धक्कादायक प्रकार...पोलीसांनी केला खुलासा

sakal_logo
By
योगेश मोरे

नाशिक / म्हसरूळ : मंदिराच्या उत्तरेला असलेल्या कुटियातील साधू महाराजांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. या ठिकाणी वरिष्ठ पोलिस अधिकारी, श्वानपथक आणि फॉरेन्सिक लॅबचे कर्मचारी हजर झाले. ​त्यानंतर झाला खुलासा

तपोवनात साधुग्रामच्या जागेतील घटना

तपोवनातील बटूक हनुमान मंदिराच्या उत्तरेला असलेल्या कुटियातील गोपालदास महाराजांनी या घटनेची माहिती आडगाव पोलिसांना दिली. या ठिकाणी वरिष्ठ पोलिस अधिकारी, श्वानपथक आणि फॉरेन्सिक लॅबचे कर्मचारी हजर झाले. कुंभमेळा झाल्यानंतर येथील मोठ्या वडाच्या झाडाखाली गोपालदास महाराजांची कुटिया बांधली आहे. कुटियाभोवती फाद्यांचे व काट्यांचे कुंपण तयार केले आहे. आत जाण्यासाठी एकच मार्ग आहे. या कुटियाच्या आवारात संतोष पवार यांची हत्या झाली. त्या ठिकाणी पोलिसांना बिड्या आढळल्या आहेत. त्यावरून पोलिस गोपालदास महाराजांची चौकशी करीत आहेत.

नशेबाजांचा अड्डा
वाढलेल्या दाट झाडीमुळे हा भाग दारू व गांजा पिणाऱ्यांचा अड्डाच बनला आहे. या परिसरात दिवसाही कुणी फिरकत नसल्याने नशेबाजांचा हा अड्डाच बनला आहे. पोलिस त्यावर कारवाईचा केवळ फार्स दाखवित असल्यामुळे वचक राहिलेला नाही. या परिसरात साधू, पुजाऱ्यांना मारहाण करणे, त्यांच्याकडून मौल्यवान वस्तू अथवा रोख रक्कम हिसकावून घेणे, बाहेरील पर्यटकांना दमदाटी करणे, लूटमार करणे अशा घटना वारंवार घडत असताना, पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा > अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना

पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल

तपोवनातील साधुग्रामच्या जागेत असलेल्या वडाच्या झाडाखाली कुटियासमोर एका व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याचा प्रकार सोमवारी (ता. ३) उघडकीस आला. संतोष पवार (वय ६०, रा. हिरावाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी आडगाव पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

रिपोर्ट - योगेश मोरे

संपादन - ज्योती देवरे

हेही वाचा > सहा फुटांच्या खड्ड्यातून आली दुर्गंधी.. गावकऱ्यांना भलताच संशय....शोध घेताच गावात एकच खळबळ