
नाशिक : MNGL कंपनीला नोटीस; परवानगी न घेता ब्लास्टींग
नाशिक : शहरात घरोघरी स्वयंपाकाचा गॅस पुरविण्याबरोबरचं वाहनांसाठी सीएनजी गॅस पुरविण्यासाठी विल्होळी नाका येथे महापालिकेच्या पूर्वीच्या जकात नाक्याची विनावापर पडून असलेली सुमारे सहा हजार चौरस मीटर जागा महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीला दहा वर्षांच्या कराराने देण्यात आली आहे. कंपनीच्या वतीने खासगी कंपनी मार्फत दोन जम्बो टाक्या बसविण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी साडेचार ते पाच मीटर खोदाई करण्यात आली आहे. खोदकाम करताना महापालिकेला न कळविता व परवानगी न घेता ब्लास्टींग करण्यात आल्याच्या तक्रारीवरून महापालिकेच्या बांधकाम विभागाने दहा ऑगस्टला नोटीस पाठवून खुलासा मागविला आहे.
विल्होळी प्रकल्पावर खोदकाम करताना ब्लास्टींग
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या वतीने विल्होळी नाका येथील प्रकल्पावर खोदकाम करताना पूर्व परवानगी न घेता ब्लास्टींग केल्याच्या तक्रारीवरून कंपनीला नोटीस पाठवून खुलासा मागविण्यात आला आहे. नोटीसमध्ये ब्लास्टींग करत असल्यास कंपनी व मक्तेदारावर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून महापालिकेने दिलेली परवानगी रद्द करण्यात येईल, अशा सूचना देताना तातडीने खुलासा करावा, असे नोटीस मध्ये म्हटले आहे. दरम्यान तीन दिवसात खुलासा करावा, अशा स्पष्ट सूचना दिल्या असल्या तरी सुट्ट्य़ांमुळे खुलासा प्राप्त झाला कि नाही याबाबत सांगता येत नाही. कार्यालयीन कामकाज सुरू झाल्यानंतर खुलासा तपासला जाईल, असे शहर अभियंता नितीन वंजारी यांनी सांगितले. समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्यास पुढील कारवाई करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा: येवला प्रांताधिकाऱ्यांची महिला तलाठीकडे शरीरसुखाची मागणी
हेही वाचा: डॉ. झाकीर हुसेन ऑक्सीजन गळती दुर्घटना : कारवाईसंदर्भात संशय
Web Title: Municipal Notice To Mngl Company Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..