esakal | नाशिककरांनो, गणेशमुर्ती विसर्जनासाठी टाईम स्लॉट आहेत बरं का!...'इथे' करा नोंदणी
sakal

बोलून बातमी शोधा

ganesh.jpg

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असताना गणेशोत्सव काळात गर्दी मुळे कोरोना  विरोधातील लढाईत बाधा निर्माण होवू नये म्हणून शासनाने नियमावली तयार केली आहे. त्यात स्वच्छतेबरोबरचं गर्दी टाळण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत. त्याच अनुशंगाने महापालिकेने मिशन विघ्नहर्ता संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला.

नाशिककरांनो, गणेशमुर्ती विसर्जनासाठी टाईम स्लॉट आहेत बरं का!...'इथे' करा नोंदणी

sakal_logo
By
सकाळ वृ्त्तसेवा

नाशिक : श्री गणेशोत्सवात गर्दी होऊ नये म्हणून महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या असून त्यासाठी नाशिककरांची साथ मिळावी अशी अपेक्षा व्यक्त महापालिकेकडून व्यक्त केली जात असून त्याच अनुषंगाने मिशन विघ्नहर्ता संकल्पना राबविली जाणार आहे. या संकल्पनेत नाशिककरांना मुर्ती विसर्जनासाठी टाईम स्लॉट उपलब्ध करून देण्यात आला असून त्यावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गर्दी टाळण्यासाठी स्टॉलवर कधी जायचे?

विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलाव येथे कधी पोहचायचे याचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी  https://www.murtidaan.nmc.gov.in/ या संकेतस्थळाचे उदघाटन महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. या संकेतस्थळावर शहरातील पहिले पाच मानाचे गणपती तथा अनुषंगीक गणेशोत्सव बाबतच्या बाबीही नमुद केल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख  डॉ.कल्पना कुटे यांनी दिली. यावेळी आयुक्त राधाकृष्ण गमे स्थायी समिती सभापती गणेश गिते, सभागृह नेता सतिश सोनवणे, विरोधी पक्ष नेता अजय बोरस्ते, शिवसेना गटनेता विलास शिंदे, राष्ट्रवादी गटनेता गजानन शेलार, यांच्यासह  माहिती व तंत्रज्ञान विभागाचे  शंतनु नाईक, फॉक्सबेरी कंपनीचे प्रतिनिधी संतोष मुंढे, ओम कासार, अभिषेक पाटील, के.के.वाघ महाविद्यालय, संदीप फाऊडेशंन, भुजबळ कॉलेज, वी.आय.टी कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते. 

हेही वाचा > अचानक सायरनचा तो धडकी भरविणारा आवाज..नागरिकांत घबराट अन् सुटकेचा निश्वास! काय घडले नेमके?

विसर्जनासाठी वेळेचे नियोजन

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असताना गणेशोत्सव काळात गर्दी मुळे कोरोना  विरोधातील लढाईत बाधा निर्माण होवू नये म्हणून शासनाने नियमावली तयार केली आहे. त्यात स्वच्छतेबरोबरचं गर्दी टाळण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत. त्याच अनुषंगाने महापालिकेने मिशन विघ्नहर्ता संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला. महापालिकेने पर्यावरण पुरक उत्सवसाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. तलावांवर एकाच वेळी गर्दी होवू नये म्हणून https://covidnashik.nmc. gov.in:8002/visarjan/ संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. यावर नोंदणी केल्यास नोंदणीधारकाला वेळ कळविली जाणार आहे. मुर्तीदान, मुर्तीचे संकलन, मुर्तीच्या विघटनासाठी अमोनियम बायोकार्बोनेट पावडरचे मोफत वितरण महापालिकेच्या वतीने केले जाणार आहे.

हेही वाचा > शिवप्रेमींत हळहळ; शिवप्रेमी रितेशची किल्ल्यावरील 'ती' सेल्फी शेवटची ठरली, काय घडले?

संपादन - किशोरी वाघ

loading image
go to top