esakal | दुर्दैवी : हळदीच्या आदल्या दिवशीच युवकाचा धारदार हत्याराने खून
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

हळदीच्या आदल्या दिवशीच धारदार हत्याराने युवकाचा खून; परिसरात हळहळ

sakal_logo
By
गोपाळ शिंदे

घोटी (जि. नाशिक) : तालुक्यातील माणिखांब येथील गजानन हरीचंद्र चव्हाण ( वय 26 ) याचे अवघ्या दोन दिवसांनंतर लग्न होणार होते. काही दिवसांमध्येच त्याच्या नव्या आयुष्याची सुरुवात होणार. मात्र, त्याआधीच त्याचा घात झाल्याचे समोर आले आहे. लग्नाच्या हळदीच्या आदल्या दिवशीच काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिसांची घटना स्थळी धाव

घोटी तालुक्यातील माणिखांब येथील युवकाचा शेणवड पाझर तलाव परिसरात पाटील वस्ती जवळ अज्ञात कारणाने शुक्रवार ( ता. 30 ) मध्यरात्री दरम्यान धारदार हत्याराने खून करण्यात आला आहे. याबाबत शनिवार ( ता. 1 ) सकाळी आठ वाजता परिसरातील नागरिकांना मयत युवकाचा मृतदेह आढळून आल्याने घोटी पोलिसांसी संपर्क साधून माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेत परिसर छाणून काढला.

हेही वाचा: राहत्या घरातून अचानक नवविवाहित बेपत्ता; काय घडले त्या रात्री?

कठीण हत्याराने घातले डोक्यावर घाव

याबाबत अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर,विभागीय अधिकारी अर्जुन भोसले,स्थानिक गुन्हे शाखेचे आर.डी. कुटे यांनी भेट देत घटनेची माहिती घेऊन मार्गदर्शन केले. सदर युवकाच्या डोक्यावर अज्ञात इसमांनी कठीण हत्याराने घाव घालत जीवे ठार मारले आहे. वरील घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे करत आहे.

हेही वाचा: देवेंद्र फडणवीस यांची सोशल मिडीयावर बदनामी; पाच जणांवर गुन्हा दाखल

loading image