esakal | दहा दिवसांपासून बेपत्ता होतो 'ते'...अन् भेटले तर अशा अवस्थेत...
sakal

बोलून बातमी शोधा

old man murder case.jpg

मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. त्यानंतर हरविलेल्यांपैकी कुणाचा मृतदेह तर नसावा ना याचा शोध घेत असताना नाशिक तालुका पोलिस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी वृद्धाची मिसिंग दाखल झाली असल्याचे समजले. मृताचे छायाचित्र घेत शोध घेतला असता ते मिळतेजुळते असल्याचे दिसताच निरीक्षक हांडे व सहकाऱ्यांनी नाईकवाडी गाव गाठले.

दहा दिवसांपासून बेपत्ता होतो 'ते'...अन् भेटले तर अशा अवस्थेत...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : सातपूर परिसरातील फाशीच्या डोंगरामागे वासळी रोड परिसरात शुक्रवारी (ता. 31) सायंकाळी साडेसातच्या सुमारास 65 वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळला. 
प्रभाकर खोसकर (वय 65, रा. नाईकवाडी) असे त्यांचे नाव आहे. या वृद्धाचा खून झाल्याचा संशय असून, ते आमदार हिरामण खोसकर यांच्या भावकीतील असल्याचे नाईकवाडी गामस्थांकडून सांगण्यात आले. 

अशी आहे घटना

नाईकवाडी येथील प्रभाकर खोसकर 21 जानेवारीपासून घरातून बेपत्ता होते. ते मिळून न आल्याने 31 जानेवारीला नाशिक तालुका पोलिस ठाण्यात सायंकाळी पाचला ते हरविल्याची पोलिसांत तक्रार देण्यात आली. दरम्यान, हरविल्याच्या नोंदीस दोन तास होत नाहीत तोच सायंकाळी साडेसातच्या सुमारास सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत फाशीच्या डोंगरामागे वृद्ध मृतावस्थेत आढळल्याचे सांगण्यात आले. सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राकेश हांडे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. त्यानंतर हरविलेल्यांपैकी कुणाचा मृतदेह तर नसावा ना याचा शोध घेत असताना नाशिक तालुका पोलिस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी वृद्धाची मिसिंग दाखल झाली असल्याचे समजले. मृताचे छायाचित्र घेत शोध घेतला असता ते मिळतेजुळते असल्याचे दिसताच निरीक्षक हांडे व सहकाऱ्यांनी नाईकवाडी गाव गाठले. या ठिकाणी काही जणांची चौकशी केली. त्यानंतर तीन मजुरांना चौकशीसाठी ताब्यात घेत सातपूर पोलिस ठाण्यात आणले. 

हेही वाचा > सख्ख्या बहिंणींनीच केली 'गद्दारी', नात्यावरचा उडला विश्वास...

मृत्यूचे कारण अजूनही स्पष्ट नाही

रात्री उशिरापर्यंत या तिघांची चौकशी सुरू होती. सरपंचांनादेखील पोलिसांनी बोलविले होते. दरम्यान, पोलिसांनी सांगितले, की मृत खोसकर यांच्या डोक्‍यावर धारदार हत्याराने वार करण्यात येऊन खून करण्यात आला असावा. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. सातपूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राकेश हांडे तपास करीत आहेत.  

हेही वाचा > 'जो आपल्याशी नडला त्याला आपण फोडला!'...'इथं' गुंडच देताय पोलिसांना आव्हान

loading image
go to top