नाशिक- सद्यःस्थितीत सीएनजी इंधन भरण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेक अडथळे, समस्या उद्भवतात. त्यामुळे लांबच लांब रांगा, वेळेचा अपव्यय, वाहतुकीची कोंडी आणि पारंपरिक पेमेंट पद्धतीमुळे होणाऱ्या विलंबामुळे वाहनचालकांना अडचणींना सामोरे जावे लागते. या समस्यांवर मात करताना मविप्र राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी ‘अॅडव्हान्स सीएनजी बुकिंग सिस्टम विथ फास्टॅग टेक्नॉलॉजी’ यंत्रणा विकसित केली आहे.