लासलगाव- ‘नाफेड’मार्फत सुरू असलेल्या कांदा खरेदी मोहिमेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात ही खरेदी दलालांच्या नियंत्रणात गेल्याने शेतकऱ्यांचा अपेक्षित लाभ होताना दिसत नाही. ‘नाफेड’च्या खरेदी प्रक्रियेत भ्रष्टाचार, विलंब, वजन आणि दर्जाविषयी त्रुटी दाखवून दरकपात अशा समस्या सातत्याने उघड होत आहेत. परिणामी, शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.