NAMCO चा नफा 50 कोटींचा; एनपीए 4 टक्कयांवर | Nashik

NAMCO profit of Rs 50 crore NPA at 4 percent
NAMCO profit of Rs 50 crore NPA at 4 percentesakal

सातपूर (जि. नाशिक) : नामको बँकेने यंदाच्या आर्थिक वर्षात ढोबळ एनपीए चार टक्क्यांवर आणला असून, यंदाच्या आर्थिक वर्षात बँकेला ५० कोटीचा नफा करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली असल्याचे नामकोचे (NAMCO) अध्यक्ष हेमंत धात्रक यांनी शुक्रवारी (ता.८) पत्रकार परिषदेत (Press conference) स्पष्ट केले.

सन २०१४ ते १८ या चार वर्षाच्या प्रशासकीय कार्यकाळात बँकेचा एनपीए ३८ टक्यांवर पोहोचला होता. त्यामुळे बँकेची आर्थिक स्थिती डबघाईला आली होती. मात्र संचालक मंडळाच्या व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने बँकेला एनपीए १४ टक्यांपर्यंत आणण्यात यश आले आहे. एनपीए चार टक्यांवर आल्यामुळे रिझर्व बँकेचे (RBI) असलेले निर्बंध शिथिल होण्यास मदत झाली आहे. रिझर्व बँकेच्या ‘फायनान्शियल साउंड अँड वेल मॅनेज’ या नियमावलीत नामको बँक आता बसणार असल्याने निर्बंध शिथिल होतील. त्यामुळे नामकोला इंटरनेट बँकिंग (E Banking) सुविधा सूरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे यावेळी त्यांनी त्यांनी सांगितले.

NAMCO profit of Rs 50 crore NPA at 4 percent
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक, अधिष्ठातांच्‍या बदल्‍या

नामको बँकेने चालू आर्थिक वर्षात १०३ कोटींच्या ठेवींची वाढ करत एक हजार ७८४ कोटींच्या ठेवी मिळवल्या असून ८३२ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करताना मागील वर्षीच्या तुलनेत ८४ कोटीचे जादा कर्ज वाटप वाटप केले आहे. बँकेचा ढोबळ नफा ५० कोटी रुपयांचा झाला असून निव्वळ नफा हा २९ कोटी झाला असल्याचे सांगत श्री. धात्रक यांनी समाधान व्यक्त केले.

NAMCO profit of Rs 50 crore NPA at 4 percent
गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नीच्या आरोपांवर गृहमंत्री म्हणाले…

नामकोने गृह कर्जाच्या माध्यमातून बँकेने ८६ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. नामको बँकेचा स्वतःचा मोबी प सुरू केला असून या माध्यमातून ग्राहकांना घरबसल्या बँकिंग करता येणे शक्य होणार आहे. या सोबतच इमीजीएट पेमेंट, युनिफाईड पेमेंट यासारख्या सुविधाही व्यापारी वर्गासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. येणाऱ्या काळात शहरांमध्ये १२ नवीन एटीएम सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. छोट्या व्यापाऱ्यांची आर्थिक अडचण लक्षात घेता त्यांच्यासाठी तातडीचे पाच लाख रुपयांचे कर्ज देण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. बँकेच्या सक्षमीकरण यामध्ये ६२ लाख रुपये खर्च करून मुख्यालयावर सोलर यंत्रणा उभारलेली असून, या माध्यमातून दरमहा तीन लाख रुपये वीज बिलात बचत होत आहे. त्यामुळे येणाऱ्या दोन वर्षात सोलरसाठी गुंतवलेले सर्व पैसे वसूल होऊन जातील, असा विश्वास धात्रक यांनी व्यक्त केला. लवकरच इतर ७ ते ८ शाखांमध्येही सोलर यंत्रणा उभारल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. बँकेचे २८ शाखा अद्ययावत करण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेस माजी अध्यक्ष सोहनलाल भंडारी, अशोक सोनजे, वसंत गीते, विजय साने, शिवदास डागा, कांतिलाल जैन, नरेंद्र पवार, प्रशांत दिवे, शोभा छाजेड, रजनी जातेगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विश्राम दीक्षित, कल्पेश पारख आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com