Namokar Tirth
sakal
प्रशांत भरवीरकर- नाशिक: मालसाने (ता. चांदवड) येथे सुमारे ४७ एकर परिसरात विस्तारलेले ‘णमोकार तीर्थ’ हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून, श्रद्धा, अध्यात्म, कला आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुरेख संगम ठरत आहे. भव्य आणि नियोजनबद्ध रचनेमुळे हे तीर्थ भाविकांसाठी एक अद्वितीय आध्यात्मिक अनुभूती देणारे केंद्र बनले. या ठिकाणी उभारण्यात येत असलेली सर्व भुवने, शेकडो मूर्ती, अनेक स्तंभ, कित्येक मार्ग या सर्वांची माहिती देण्यासाठी एक ऑडिओ गाइड बनविण्यात येणार आहे. या ४७ एकर परिसरात भाविक कोठेही उभा राहिल्यास त्या जागेची माहिती त्याला तत्काळ मिळेल.