Nampur Bazar Samiti: बाजार समितीच्या निवडणुकीत अद्वय हिरेंची एन्ट्री! मोसम खोऱ्यातील राजकीय हालचाली गतिमान

Nampur Bazar Samiti
Nampur Bazar Samitiesakal

Nampur Bazar Samiti : येथील नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आगामी काळात होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोसम खोऱ्यातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, इच्छुकांनी मतदारांच्या भेटीगाठीवर जोर दिला आहे.

यंदाच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार नाकारला असला तरी निवडणुकीत उमेदवारी करण्याची संधी मिळाल्याने उन्हातान्हात काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचे राजकारणाचे स्वप्न साकार होणार आहे.

यंदाच्या निवडणुकीत मालेगाव बाजार समितीचे सभापती, शिवसेनेचे उपनेते ॲड. अद्वय हिरे-पाटील यांची एन्ट्री झाली असून, महाविकास आघाडीच्या पॅनलचे नेतृत्व करणार असले तरी उमेदवारांची नावे अद्यापही गुलदस्त्यात आहेत. (Nampur Bazar Samiti Entry of Advaya Hireni in Bazar Samiti elections Political movements in Mosam Valley dynamic nashik)

विद्यमान भाजपचे आमदार दिलीप बोरसे, राष्ट्रवादीचे यतीन पगार यांच्या नेतृत्वाखाली पॅनलची निर्मिती होणार असून, प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीच्या पॅनलमध्ये माजी आमदार संजय चव्हाण, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष डॉ. प्रशांत सोनवणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. अनिल पाटील यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहील.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीमुळे शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेचा निवडणूक कार्यक्रमाला विरोध असल्याने निवडणूककाळात दोन पॅनल निवडणुकीच्या रिंगणात राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून बाजार समितीच्या निवडणुकीकडे पाहिले जाते. त्यामुळे नामपूर बाजार समितीच्या निवडणुकीत आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

निवडणुकीच्या अनुषंगाने होणाऱ्या राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना इच्छुकांची गर्दी पाहायला मिळत आहे. तर काहींनी सोशल मीडियाचा आधार घेत रणशिंग फुंकले आहे.

गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांची संचालक मंडळाने वारेमाप उधळपट्टी केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

बाजार समितीला दर वर्षी कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळते. परंतु शेतकऱ्यांना कोणत्याही सुविधांचा लाभ मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. सभापतिपदाच्या दर वर्षी होणाऱ्या आवर्तन पद्धतीमुळे बाजार समितीत स्थिर प्रशासनाचा अभाव दिसून आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nampur Bazar Samiti
Jalgaon News: कॉरिडोरमुळे जळगावच्या केळीला येणार ‘अच्छे दिन’! 10 वर्षांचे नियोजन आवश्‍यक

बाजार समितीच्या होणाऱ्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची तक्रार खुद्द बाजार समितीचे माजी सभापती कृष्णा भामरे यांनी समाजमाध्यमात केल्याने संचालक मंडळाच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली गेली.

यंदा शासनाने शेतकऱ्यांचा मतदानाचा अधिकार काढून जुन्या पद्धतीप्रमाणे सहकारी सोसायटीचे संचालक, ग्रामपंचायत सदस्य यांना मतदानाचे अधिकार बहाल केले आहेत. त्यामुळे निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

यंदाच्या बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक उमेदवार इच्छुक आहेत. मोसम खोऱ्यातील काही पोलिसपाटील विविध राजकीय पक्षांच्या संपर्कात असून, त्यांनी उमेदवारीसाठी मोट बांधली आहे. निवडणुकीत कोण बाजी मारेल, याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.

"सोमवारी (ता. ११) नामांकनपत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने संभाव्य इच्छुकांची संख्या पाहता निवडणूक कर्मचाऱ्यांची संख्या, टेबल संख्या वाढवली आहे. उमेदवारांना तलाठी यांचा शेतकरी, रहिवासी असल्याबाबतचा दाखल बंधनकारक असून, शेतीचा सातबारा उतारा अद्ययावत असणे गरजेचे आहे. विक्री झालेल्या १९६ फॉर्ममधून ४९ अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारांनी निवडणूक प्राधिकरणाला सहकार्य करावे."

- जितेंद्र शेळके, निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निबंधक बागलाण

Nampur Bazar Samiti
Nashik News: गिरणा धरणाच्या जलाशयात 10 लाख मत्स्यबीज! आमदार कांदे यांची स्थानिक मच्छीमारांना मदत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com