esakal | काय सांगता! 'या' बाजार समितीत कांदा फक्त दीड रुपये किलो
sakal

बोलून बातमी शोधा

onion

काय सांगता! 'या' बाजार समितीत कांदा फक्त दीड रुपये किलो

sakal_logo
By
प्रशांत बैरागी

नामपूर (जि.नाशिक) : येथील बाजार समितीच्या (market committee) आवारात एका व्यापाऱ्याने कांद्याला (onion) अवघा दीड रुपये प्रतिकिलो असा भाव दिला. असे काय घडले की हा कांदा शेतकऱ्याला (farmer) केवळ दीड रुपये किलोने विकावा लागला.

शेतकऱ्याने चक्क कांदा दीड रुपये किलो विकला

नामपूर येथील बाजार समितीच्या आवारात सोमवारी (ता. १०) एका व्यापाऱ्याने कांद्याला अवघा दीड रुपये प्रतिकिलो असा भाव दिला. येथील बाजार समितीत संचालक मंडळाचा वचक नसल्याने शेतकऱ्यांची लूट होत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. यंदा मोसम खोऱ्यात विक्रमी कांदा लागवड असल्याने गेल्या महिन्यापासून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. शेतकऱ्यांनी यंदा प्रतिकूल परिस्थितीत उन्हाळ कांदा लागवडीसाठी एकरी ४० ते ५० हजार रुपयांपर्यंत खर्च केला. कांद्याचे उत्पादन पदरात पडेपर्यंत क्विंटलला सरासरी दीड हजार रुपये खर्च झाला. यंदाच्या रोगट हवामान, पाऊस, परिसरातील बहुतांश भागात कांद्याचे ३० ते ४० टक्के उत्पादन घटले आहे. त्यातच कांद्याचे भाव कोसळल्याने शासनाने तत्काळ उत्पादन खर्चावर आधारित बाजारभावाचे नियोजन करावे किंवा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी उत्पादन खर्चाइतके अनुदान द्यावे, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अभिमन पगार यांनी केली आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला.

हेही वाचा: कोरोनामुळे सरकारी बदल्यांना ३० जूनपर्यंत स्थगिती

अनेक दिवसांपासून शेतकरी नामपूर बाजार समितीऐवजी उमराणे, पिंपळगाव बसवंत येथे कांदा विकण्यास पसंती देत आहेत. येथील बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा माल उत्कृष्ट दर्जाचा असतानासुद्धा योग्य भाव मिळत नाही. भाव मिळाला नाही तर शेतकरी वाद घालतात आणि मार्केट बंद पडतं. यामध्ये सर्वस्वी नुकसान शेतकऱ्यांचेच होते. त्यामुळे बाजार समितीवर संचालकांचे राज्य आहे की व्यापाऱ्यांचे, हाच खरा प्रश्‍न आहे. -चारुदत्त खैरनार, सामाजिक कार्यकर्ते

प्रतिक्विंटल कांदा दर

* किमान : ३०० रुपये

* कमाल : १२५५

* सरासरी : ९५०

* एकूण वाहन : ६८०

* अंदाजे आवक : १५ हजार क्विंटल

हेही वाचा: लॉकडाउनच्या घोषणेनंतर नाशिककरांची बाजारपेठेत तोबा गर्दी; पाहा VIDEO

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यंदा कांद्याच्या दरात सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ सहन करावी लागली. उत्पादन खर्चदेखील भरून न निघाल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा वाढला आहे. त्यामुळे शासनाने शेतकरी व ग्राहकहित लक्षात घेऊन कांद्याला हमीभाव जाहीर करावा. -अभय सावंत, कांदा उत्पादक, नामपूर

loading image