esakal | नामपूरला उन्हाळ कांद्याची विक्रमी आवक
sakal

बोलून बातमी शोधा

Onion

नामपूरला उन्हाळ कांद्याची विक्रमी आवक

sakal_logo
By
प्रशांत बैरागी

नामपूर (जि. नाशिक) : येथील बाजार समिती व करंजाड उपबाजार आवारात सुमारे अकराशे वाहनांमधून १८ हजार २०० क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. उन्हाळ कांद्याला एक हजार ९५५ रुपये, करंजाड उपबाजारात दोन हजार रुपये प्रतिक्विंटल असा सर्वोच्च भाव मिळाला. एक हजार ६०० रुपये असा सरासरी भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती शांताराम निकम, उपसभापती लक्ष्मण पवार, सचिव संतोष गायकवाड यांनी दिली. (Nampur market witnessed a record influx of summer onions)


मोसम खोऱ्यात यंदा विक्रमी कांदा शेतकऱ्यांकडे आहे. खरीप हंगामासाठी रासायनिक खते, बी-बियाणे, मजुरी आदी बाबींसाठी शेतकऱ्यांना आर्थिक गरज असल्याने बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. गुरुवारी (ता. ८) सकाळी नऊपासून लिलावाला सुरवात झाली. कोरोनाचे सर्व नियम पाळून नामपूरला सातशे, तर करंजाडला चारशे वाहनांचा लिलाव करण्यात आला. जिल्हा उपनिबंधक, सटाणा येथील सहाय्यक निबंधकांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे कोरोना काळात बाजार समितीचे लिलाव कामकाज नियमित सुरू झाले आहे. शेतकऱ्यांनी मालाची प्रतवारी करून माल विक्रीस आणावा, लिलाव झाल्यानंतर संबंधित व्यापाऱ्यांकडून रोख पेमेंट घ्यावे, कोरोना काळात गर्दी टाळण्यासाठी बाजार समिती प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सचिव संतोष गायकवाड, अरुण अहिरे यांनी केले आहे.

हेही वाचा: चणकापूरमधून कळवण शहराला 2.25 दशलक्ष घनमीटर पाणीबाजारभाव असे :

-------कमी--- जास्त--- सरासरी

कांदा--- ३०० --- १,९५५ --- १,६००
मका--- १,६९९ ----१,७०० --- १,६९९
बाजरी--- १,३९० --- १,४२५ ---- १,३९०
चना --- ३,५०० --- ४,१०० ----- ३,५००
डाळिंब -----९०---- १,२६० --- ७५०

(Nampur market witnessed a record influx of summer onions)

हेही वाचा: 'मी ईडीचा प्रवक्ता नाही', फडणवीस यांची संतप्त प्रतिक्रिया

loading image