चणकापूरमधून कळवण शहराला 2.25 दशलक्ष घनमीटर पाणी

chanakapur dam
chanakapur dam Sakal
Updated on

कळवण (जि. नाशिक) : कळवण शहराच्या वाढत्या विस्तारामुळे उपलब्ध साधनातून भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जाण्याची भीती लक्षात घेऊन आमदार नितीन पवार, नगरपंचायत गटनेते कौतिक पगार यांनी जलसंपदा विभागाकडून कळवण शहरासाठी 2.25 दशलक्ष घनमीटर पाणी मंजूर करुन घेतल्यामुळे भविष्यात पाणीटंचाई निर्माण होणार नसल्याने कळवणकरांना दिलासा मिळाला आहे. (water sanctioned from chanakapur dam to kalvan city nashik news)


शिवाजीनगर, गणेशनगर, संभाजीनगर, रामनगर, गांधी चौक, फुलाबाई चौक, नेहरु चौक, मेनरोड, सावरकर चौक, मोहल्ला, ओतूर रोड आदी नगरपंचायतच्या 17 प्रभागात कळवण शहर विस्तारले आहे. ग्रामपंचायत असताना पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून जनतेच्या पिण्याच्या पाण्याची सोडवणूक नगरपंचायतच्या माध्यमातून सद्यस्थितीत केली जाते. सध्या नगरपंचायतच्या पाणीपुरवठ्यासाठी जलसंपदा विभागाकडून चणकापूर धरणातून 0.86 दशलक्ष घनमीटर पाणी मंजूर आहे. कळवणला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या योजना गिरणा नदीपात्रात असून, योजनांचे उद्‌भव (विहिरी) उन्हाळ्यात कोरडेठाक पडतात. तेव्हा इतर खासगी विहीर मालकांकडून पाणी घेऊन कळवणकरांच्या पाणीप्रश्‍नाची सोडवणूक नगरपंचायत प्रशासनाला काहीवेळा करावी लागते. अर्जुन (नकट्या) बंधाऱ्याचे विघ्न मिटवण्यात तत्कालीन आमदार ए. टी. पवार, तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य, तसेच, आमदार नितीन पवार, गटनेते कौतिक पगार यांना यश आले.

chanakapur dam
'मी ईडीचा प्रवक्ता नाही', फडणवीस यांची संतप्त प्रतिक्रिया


पाणीटंचाई टळणार…

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी खास बाब म्हणून प्रस्तावाला मंजुरी दिल्याने कळवण नगरपंचायतीच्या पाणीपुरवठ्यासाठी जलसंपदा विभागाकडून 1.39 दशलक्ष घनमीटर पाणी मंजूर करुन केले आहे. 2051 सालची लोकसंख्या गृहीत धरून या पाण्याचे चणकापूर धरणात आरक्षण देण्यात आले आहे. सध्या कळवणकरांना 0.86 दशलक्ष घनमीटर पाणी चणकापूरमधून मंजूर आहे. पूर्वीची आणि आजची मंजुरी लक्षात घेता आता 2.25 दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई निर्माण होणार नसल्याने दिलासा मिळणार आहे.

(water sanctioned from chanakapur dam to kalvan city nashik news)

chanakapur dam
नाशिकसाठी 50 इलेक्ट्रीक बसेससाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार - फडणवीस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com