Who is Vijay Chaudhary?
esakal
नंदुरबार : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी यांना धुळे येथून ताब्यात घेण्यात आले. नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुरुवारी (ता. ६) रात्री आठच्या सुमारास ही कारवाई (Nandurbar BJP leader detention update) केली. त्यानंतर चौधरी यांना नंदुरबार येथे आणण्यात आले असून, रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावरील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू होती.