suspension
sakal
नाशिक: बोगस शालार्थ आयडी प्रकरणी ‘एसआयटी’ स्थापन करण्यात आलेली असताना बेहिशोबी मालमत्ता व शिक्षकांची आर्थिक लूट केल्याप्रकरणी नंदुरबारचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांना निलंबित करण्यात आले आहे. शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी बुधवारी (ता.१०) विधानपरिषदेत याविषयी तारांकित प्रश्न उपस्थित केल्यामुळे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी हा निर्णय अधिवेशनात घोषित केला.