नंदुरबार : पोलिस भरतीसाठी ११ केंद्रांवर परीक्षा झाली शांततेत | Police Recruitment | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police Recruitment
पोलिस भरतीसाठी ११ केंद्रांवर परीक्षा झाली शांततेत

नंदुरबार : पोलिस भरतीसाठी ११ केंद्रांवर परीक्षा झाली शांततेत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार - शहरातील अकरा केंद्रांवर रविवारी (ता. १४) जिल्हा पोलिस दलाच्या भरती प्रक्रियेसाठी लेखी परीक्षा अत्यंत कडक पोलिस बंदोबस्तात झाली. साडेचार हजार उमेदवारांनी परीक्षा दिली. पोलिस भरती प्रक्रिया- २०१९ अंर्तगत २५ जागांसाठी सकाळी अकरा ते दुपारी साडेबारपर्यंत लेखी परीक्षा येथील कमला नेहरू कन्या विद्यालय, यशवंत विद्यालय, श्रॉफ हायस्कूल, डी. आर. हायस्कूल, डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल, एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, जी. टी. पाटील महाविद्यालय, अँग्लो उर्दू हायस्कूल, पी. के. पाटील माध्यमिक विद्यालय, एकलव्य हायस्कूल, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल या ११ परीक्षा केंद्रांवर झाली. परीक्षा शांततेत व सुरळीतसाठी तसेच कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार यांचा मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त होता.

हेही वाचा: अनारक्षित पँसेजर गाड्या उद्यापासून रूळावर! प्रवाशांना दिलासा

प्रत्येक परीक्षा केंद्रावर दोन भरारी पथकांसह विशेष पथकांची करडी नजर होती. प्रत्येक परीक्षा केंद्रावर चेकींग-फ्रिस्कींग करूनच परीक्षेसाठी येणाऱ्या उमेदवारांची बारकाईने कसून तपासणी झाली. प्रत्येक केंद्राच्या मेन गेट व परिसरावर लक्ष केंद्रित करण्यासाठी पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांसोबत योग्य तो पोलिस बंदोबस्त होता. प्रत्येक केंद्राच्या प्रत्येक खोलीनिहाय एक पोलिस अंमलदार बंदोबस्तासाठी नेमला होता. बॅगेज रुम व स्वच्छतागृह येथेही बंदोबस्त होता. पोलिस अधीक्षक कार्यालयात स्ट्रॉँगरूम तयार करून त्या ठिकाणी सशस्त्र पोलिस अंमलदार नेमले आहेत. येथून प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वी पोलिस निरीक्षक दर्जाचे अधिकारी दुसऱ्या सशस्त्र अंमलदारांसोबत आपल्या केंद्रांवर घेऊन गेले. परीक्षा संपल्यानंतर त्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका आपल्या केंद्रावरुन स्ट्रॉँगरुमपर्यंत घेऊन आले. परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पडण्यासाठी प्रत्येक केंद्रावर व्हिडिओ शूटिंग केले आहे. पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी परीक्षा काळात काही केंद्रांवर भेट देऊन पाहणी केली.

loading image
go to top