बोहाडा उत्सवात विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवाळांनी नाचवले मुखवटे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narhari zirwal

बोहाडा उत्सवात विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवाळांनी नाचवले मुखवटे

वणी (जि. नाशिक) : दिंडोरी तालुक्यातील बोपेगाव येथे अक्षयतृतीयेपासून पारंपरिक बोहडा उत्सव उत्साहात सुरू असून, शनिवारी (ता. ७) विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी उत्सवात सहभागी होऊन पांडवाच मुखवटा डोक्यावर चढवून संबळावर ठेका धरून उत्सवाचा उत्साह वाढविला. (Narhari Zirwal danced at Bohada festival)

बोपगाव (ता. दिंडोरी) येथे शंभर वर्षांपासून परंपरेनुसार दर वर्षी अक्षयतृतीयेपासून बोहाडा उत्सवाचे आयोजन करण्यात येते. हा उत्सव पाच वर्षांच्या खंडानंतर या वर्षी साजरा करण्यात येत आहे. येणाऱ्या प्रत्येक पात्राची पौराणिक ऐतिहासिक माहिती बघण्यासाठी आलेल्या उपस्थितांना गावातील अभ्यासू व प्रतिष्ठित व्यक्ती भिकाभाऊ कावळे, वसंतराव कावळे, किशोर माळोदे, विश्वनाथ कावळे हे माहिती देतात. हा उत्सव सलग सहा दिवस चालतो. त्यानंतर सातव्या दिवशी सकाळी देवी- महिषासुर या पात्राने कार्यक्रमाची सांगता होते. गावातील आबालवृद्ध व पंचक्रोशीतील भाविक कार्यक्रम पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित राहतात. गावातील असंख्य तरुण कार्यकर्ते ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपली परंपरा टिकवण्यासाठी परिश्रम घेत आहेत. डेल आर्ट इंटरनॅशनल स्कूल ऑफ फिजिकल थिएटर यांनी जगभरातील दहा उत्सवांचा निर्देश केला आहे. त्यामध्ये याचा समावेश केला जातो आणि ही परंपरा अबाधित ठेवण्याचे काम बोपेगाव ग्रामस्थ करीत आहे. बोपेगावचे सरपंच वसंत कावळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी झिरवाळ यांच्यासोबत ठेका धरला होतो.

हेही वाचा: नाशिक : ब्रिटिश काळातील बंधारा दुरुस्तीमुळे शेतीपिकांना नवसंजीवनी

हेही वाचा: जगात भारतीय मक्याला सुवर्णकाळ

Web Title: Narhari Zirwal Danced At Bohada Festival Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashiknarhari zirwal
go to top