नारोशंकरची घंटा : तुमच्यापेक्षा माझ्या कुत्र्याला कळतं कोणावर भुंकायच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Naroshankrachi ghanta

नारोशंकरची घंटा : तुमच्यापेक्षा माझ्या कुत्र्याला कळतं कोणावर भुंकायच

नाशिक : सध्या एका राजकीय पक्षाचा हाकललेला पदाधिकारी गेल्या दीड वर्षापासून गेलेले पद पदरी मिळावे म्हणून राज्य कमिटी समोर लोटांगण घालत आहे.

पदवीधर मतदार संघाच्या प्रचारार्थ सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात नुकत्याच एका कार्यक्रमा दरम्यान या नेत्याने आपले समर्थक बोलावून राज्य कमिटी समोर पदासाठी आंदोलन केले. (Naro Shankarachi ghanta comedy tragedy political crime graduate election update nashik news)

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

यावेळी कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. याला उत्तर म्हणून राज्य कमिटी बरोबर असणाऱ्या नाशिकच्या स्थानिक एका कार्यकर्त्याने थेट फेसबुकला स्वतःच्या कुत्र्याचा फोटो पोस्ट करून त्यावर लिहिले आहे की 'तुमच्यापेक्षा माझ्या कुत्र्याला समजतं कोणावर भुकायचं आणि कोणावर नाही'.

या फेसबुक पोस्टमुळे सध्या सोशल मीडियावर सर्वांना हसू फुटत आहे. शिवाय माझ्या कुत्र्याला गुचक्या लागत असल्याचे कार्यकर्ता इतर कार्यकर्त्यांना सांगत आहे.

सदर फोटो सोशल मीडिया वरून घेतलेला असून आवश्यकता असल्यास क्रॉप करून घ्यावा ही विनंती.