नारोशंकराची घंटा : भरकटलेल्या साहित्यिकाचं आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kusumagraj

नारोशंकराची घंटा : भरकटलेल्या साहित्यिकाचं आंदोलन

कुठलाही शासकीय कार्यक्रम म्हटला की त्यात विघ्नसंतोषी लोक काहीतरी गोंधळ घालतात. त्यात सोमवारी तात्यासाहेबांची जयंती म्हटल्यावर भरकटलेला एक साहित्यिक ही पर्वणी साधायला तयारच होता.

महाकवींच्या नावाने असलेल्या भव्य सभागृहात त्याला ‘गोंधळ’ घालण्याचा त्याचा ठाम निर्धार होता. त्याने भर सभागृहात प्रवेश केला. (Naroshankarachi ghanta Movement of Lost Literary nashik news)

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

समोर बघितले तर साहित्य क्षेत्राशी निगडित दिग्गज व्यक्ती व्यासपीठावर विराजमान झालेले. त्यांच्यासमोर ‘गोंधळ’ घालून काहीच उपयोग नाही म्हणून या भरकटलेल्या साहित्यिकाने कार्यक्रम संपण्याची वाट बघितली.

कार्यक्रम रंगात आला.एका पेक्षा एक सरस असलेले वक्ते बोलले. सर्वात शेवटी अध्यक्ष म्हणून पोलिस खात्यातील उच्चपदस्थ व्यक्ती बोलणार म्हटल्यावर त्यांचेही ऐकून घेतले. सर्वांचे बोल कानी पडल्यानंतर या भरकटलेल्या साहित्यिकांचा विचार पालटला आणि त्याने सभागृहातील ‘गोंधळ’ रद्द केला.

कार्यक्रम संपल्यानंतर स्टेजच्या पाठीमागे जाऊन पोलिस अधिकाऱ्यांना भेटून आपण ‘गोंधळ’ घालण्यासाठी आलो होतो, पण तुमचे विचार ऐकल्यानंतर ‘गोंधळा’ चा निर्णय रद्द केल्याचे सांगितले.

अधिकाऱ्यांनाही बरे वाटले किमान आपल्या कार्यक्रमाचे फलित तर झाले. त्याचा इरादा ऐकून सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला, किमान वर्षभर तरी या भाऊंची भेट होऊ नये म्हणजे, ‘गंगेत घोडं न्हालं’...