नारोशंकराची घंटा : अन् काय, मुख्यमंत्री निघाले नाशिकला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cm eknath shinde

नारोशंकराची घंटा : अन् काय, मुख्यमंत्री निघाले नाशिकला

मुख्यमंत्री कुठल्याही पक्षाचे असू देत नाशिककरांसाठी त्यांची भेट तशी दुर्लभ असते. क्वचित काही प्रसंगी मुख्यमंत्री शहरात येत असतात. परंतु यंदाचे मुख्यमंत्री मात्र त्यास अपवाद आहे. (naroshankarachi ghanta sakal special CM left for Nashik news)

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

गेल्या काही महिन्यात त्यांचे विविध कारणांनी अनेक दौरे झाले आहे. काही दौरे तर अचानक झाले आहे. नाशिकशी जणू त्यांचे काही वेगळे नाते आहे की काय असे सर्वांना वाटू लागले आहे. काही दिवस झाले नाही तर लगेचच त्यांचा नाशिक दौरा होत असतो.

रविवार (ता. ३०) रोजी देखील असाच त्यांचा अनपेक्षित दौरा झाल्याने आमची धावपळच उडाली. असे शब्द पोलिस विभागाच्या एका कर्मचाऱ्यांच्या मुखातून बाहेर पडले. काहीही झाले अन काय मुख्यमंत्री निघाले नाशिकला.

अशी अवस्था सध्या झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कधी शहरात येतील सांगता येत नाही. दौऱ्याचे तुम्हाला समजले तर आम्हास सांगत चला. असे त्याने एका पत्रकारास विनंती केली. त्यांचे ते संभाषण नागरिकांनी ऐकल्याने त्यांच्यात स्मित हास्यसह एकच चर्चा रंगली.

टॅग्स :CM Eknath ShindeNashik