नारोशंकराची घंटा : गप्पा- गोष्टी कट्ट्यावरच्या...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Friends Takling

नारोशंकराची घंटा : गप्पा- गोष्टी कट्ट्यावरच्या...!

स्थळ : शहरातील मध्यवर्ती चौक, वेळ - पदवीधर मतदानाची

शहरातील मध्यवर्ती अशा एका चौकात काही अनुभवी मंडळींची गप्पांची मैफील रंगली होती. विषय होता देश आपला कोणत्या दिशेने वाटचाल करतो आहे. दिल्लीत शासन करणाऱ्यांनी कारभार करताना काय करायला हवे आणि काय नको हे चर्चेत प्रामुख्याने मांडले जात होते. (naroshankarachi ghanta sakal special comedy humour nashik news)

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

याच मंडळींच्या शेजारी एक व्यक्ती बसली होती ती शांत चित्ताने त्यांच्या गप्पा ऐकत होती. न राहवून त्यांना म्हणाली ‘तुम्ही सर्व सुशिक्षित दिसता आहात’ त्यावर एक जण उत्तरला ‘हो.. तर आम्ही सर्वजण उच्चशिक्षित आहोत.’

यावर ती व्यक्ती म्हणाली मग तुम्ही देशातील कारभाराविषयी इतकी विस्तृत चर्चा करताहेत, तर तुम्ही जबाबदारीने आज पदवीधराला मतदान केलंच असेल, होना... तेव्हा मात्र ही मंडळी गडबडली अन् तेथून काढता पाय घेता झाली... ते तडकाफडकी का निघून गेले याचं उत्तर मात्र त्या व्यक्तीला आणि आपल्याला लक्षात आलंच असेल, हो ना..!