Nashik MGNREGA News: जिल्ह्यात रोहयोतंर्गत मजुरांचे 11 कोटी थकले! दुष्काळात केवळ वैयक्तिक लाभाच्या योजनांची कामे सुरू

Nashik News : सध्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार हमी हाच एकमेव आधार असला, तरी रोजगार हमीची मजुरी वेळेत मिळत नसल्याने रोजगार हमीवरील मजुरांची संख्या रोडावली आहे.
MGNREGA News
MGNREGA Newsesakal

Nashik MGNREGA News : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या राज्यभरातील कुशल कामे, अर्धकुशल व अकुशल मजुरांचे ११ जानेवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ या काळातील राज्याचे ४८० कोटी रुपये थकले आहेत. यात नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये ग्रामपंचायत व इतर यंत्रणांच्या माध्यमातून झालेल्या कामांचे ३१ मार्चपर्यंत ११ कोटी रुपये थकले आहेत.

यामुळे वैयक्तिक लाभाच्या योजना वगळता कोणत्याही ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात सार्वजनिक कामे ठप्प आहेत. सध्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार हमी हाच एकमेव आधार असला, तरी रोजगार हमीची मजुरी वेळेत मिळत नसल्याने रोजगार हमीवरील मजुरांची संख्या रोडावली आहे. (Nashik 11 crores of labor under MGNREGA in district During drought only personal benefit schemes work marathi news)

ग्रामीण भागातील अकुशल मजुरांना वर्षभरात किमान १०० दिवस रोजगाराची हमी देणारा महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना कायदा केंद्र सरकारने केला असून, त्यात मजुरांची ऑनलाइन हजेरी घेऊन दर आठवड्याला त्यांच्या कामाची रक्कम जमा केली जाते. ही मजुरीची रक्कम केंद्र सरकार थेट जमा करीत असते.

मात्र, २०२३-२४ या आर्थिक वर्षात पहिल्यांदाच रोजगार हमीचे वेतन व कुशल कामांचा निधी मिळण्यात वारंवार उशीर झाला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर व ऑक्टोबरचे रोजगार हमी मजुरांचे पैसे केंद्र सरकारने नोव्हेंबरमध्ये दिले. त्यानंतर २ नोव्हेंबरपासून पुन्हा थकविण्यात आलेले वेतन जानेवारी २०२४ मध्ये दिले.

त्यानंतर थकविण्यात आलेला रोजगार हमीचा निधी ३१ मार्चपर्यंत देण्यात आला नाही. जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीतील राज्यभरातील ४८० कोटी रुपये थकीत आहेत. यात, जिल्ह्यातील झालेल्या कामांचे ११ कोटी रुपये थकले आहेत. वर्षभरात तीनवेळा वेळेवर केंद्र सरकारकडून निधी आला नाही, त्यामुळे रोजगार हमीवरील मजुरांना दोन-दोन महिने वाट बघावी लागत आहे. (latest marathi news)

MGNREGA News
Loksabha Election: भूमिका पटवून देताना नेत्यांची उडतेय भंबेरी! राजकीय मित्र शत्रूपक्षात; गेल्या 5 वर्षांतील राजकीय उलथापालथीचा परिणाम

मजुरांची संख्या रोडावली

नवीन आर्थिक वर्षात पुन्हा रोजगार हमीची कामे सुरू झाली आहेत. मात्र, रोजगार हमीच्या कामांची मजुरी वेळेत मिळत नसल्यामुळे रोजगार हमी योजनेतून सार्वजनिक योजनांच्या कामांवरील मजुरांची संख्या रोडावली आहे. यामुळे घरकुल, गोठे, शोषखड्डे, शेततळे आदी वैयक्तिक लाभाच्या योजनांमधील कामे सुरू असून, त्या कामांवरील मजुरांमुळे रोजगार हमी योजनेत अकुशल मजुरांची संख्या दिसत आहे.

वैयक्तिक लाभाची कामे साधारणपणे ठेकेदाराकडून करून घेतली जातात. तसेच त्या योजनेचे लाभार्थी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचेच जॉबकार्ड काढून ते स्वत: काम करीत असल्याचे कागदोपत्री दाखवत असतात. त्यामुळे रोजगार हमी योजनेच्या कामांवर मजूर असल्याचे दिसत आहे.

MGNREGA News
Nashik Lok Sabha Election 2024 : विचारात न घेतल्याने मनसैनिकांची घालमेल!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com