Nashik News : रोहयो मजुरांचे थकीत 15 कोटी अखेर मिळाले

Nashik : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या जिल्ह्यातील कुशल कामे, अर्धकुशल व अकुशल मजुरांची नाशिक जिल्ह्यातील ११ जानेवारीपासून थकलेली १५ कोटींची रक्कम अखेर मजुरांच्या खात्यात जमा झाली आहे.
money
moneyesakal

Nashik News : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या जिल्ह्यातील कुशल कामे, अर्धकुशल व अकुशल मजुरांची नाशिक जिल्ह्यातील ११ जानेवारीपासून थकलेली १५ कोटींची रक्कम अखेर मजुरांच्या खात्यात जमा झाली आहे. केंद्र सरकारने २४ एप्रिलला ही रक्कम मंजूर केली असून, टप्प्याटप्प्याने सर्व मजुरांना ही रक्कम मिळाली आहे. वर्षभरात किमान १०० दिवस रोजगाराची हमी देण्यासाठी केंद्र सरकारने ग्रामीण भागातील अकुशल मजुरांना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना कायदा केला आहे. (Nashik 15 Crore dues of Rohyo laborers finally received)

त्यात मजुरांची ऑनलाइन हजेरी घेऊन दर आठवड्याला त्यांच्या कामाची रक्कम बँक खात्यात जमा केली जाते. ही मजुरीची रक्कम केंद्र सरकार थेट जमा करीत असते. रोजगार हमी योजनेतून मजुरांना मजुरी देण्याबाबत वेळापत्रक निश्चित केले आहे. मात्र, २०२३--२४ या आर्थिक वर्षात तीनवेळा मजुरांचे वेतन थकवण्याचा प्रकार घडला. केंद्र सरकारकडून निधी न आल्याने रोजगार हमीच्या कामांवरील मजुरांना दोन-दोन महिने वाट बघावी लागली.

गेल्या वर्षी सप्टेंबर व ऑक्टोबरचे रोजगार हमी मजुरांचे पैसे केंद्र सरकारने नोव्हेंबरमध्ये दिले. त्यानंतर २ नोव्हेंबरपासून पुन्हा थकविण्यात आलेले वेतन जानेवारी २०२४ मध्ये दिले. त्यानंतर थकविण्यात आलेला रोजगार हमीचा निधी अखेर २४ एप्रिलला देण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील रोजगार हमी मजुरांचे ३१ मार्चपर्यंत ११ कोटी रुपये व २४ एप्रिलपर्यंत सुमारे चार कोटी रुपये असे १५ कोटी रुपये थकले होते. (latest marathi news)

money
Nashik News : उन्हाच्या तडाख्यात कुरडई, पापड तयार करण्याचा धडाका

सरकारने या मजुरांच्या तसेच पुरवठादारांच्या खात्यात रक्कम जमा केली आहे. रोजगार हमीच्या कामांची मजुरी वेळेत मिळत नसल्यामुळे रोजगार हमी योजनेतून सार्वजनिक योजनांच्या कामांवरील मजुरांची संख्या रोडावली असून, केवळ घरकुल, गोठे, शोषखड्डे, शेततळे आदी वैयक्तिक लाभाच्या योजनांमधील कामे सुरू असून, त्या कामांवरील मजुरांमुळे रोजगार हमी योजनेत अकुशल मजुरांची संख्या दिसत आहे.

महाराष्ट्रात २०२३-२४ या आर्थिक वर्षात चार हजार ४७६ कोटी रुपयांची कामे रोजगार हमी योजनेतून करण्यात आली. त्यातील ४८० कोटी (यात कुशल व अकुशल कामांचे अनुक्रमे १८० व ३०० कोटी) आर्थिक वर्ष संपल्यानंतरही केंद्र सरकारने वितरित केले नव्हते. अखेरीस सरकारने ही रक्कम जमा केल्यामुळे आता गेल्या आर्थिक वर्षात रोजगार हमी योजनेतील कामांवरील अकुशल मजूर, अर्धकुशल मजूर व कुशल कामांची रक्कम पूर्णपणे मिळाली आहेत.

money
Nashik News : वेगवेगळ्या घटनांमध्ये शहरातून नऊ जण बेपत्ता; 5 महिला, युवती आणि 4 पुरुषांचा समावेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com