Nashik Lok Sabha Election : दिंडोरीत 1, तर नाशिकमध्ये 2 ‘ईव्हीएम’ मशिन्स

Lok Sabha Election : नाशिक लोकसभेत २० लाख ३० हजार मतदारांसाठी एक हजार ९१० मतदान केंद्र आहेत. दिंडोरीत १८ लाख ५३ हजार मतदारांसाठी एकूण एक हजार ९२२ मतदान केंद्र आहेत.
EVM machine
EVM machineesakal

Nashik News : लोकसभा निवडणुकीत अर्ज माघारीनंतर उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर नाशिकमध्ये ३१ उमेदवार असल्याने दोन ईव्हीएम मशिन्स, तर दिंडोरीत एक ईव्हीएम मशिन लावावे लागणार आहे. नाशिक लोकसभेत २० लाख ३० हजार मतदारांसाठी एक हजार ९१० मतदान केंद्र आहेत. दिंडोरीत १८ लाख ५३ हजार मतदारांसाठी एकूण एक हजार ९२२ मतदान केंद्र आहेत. (Nashik 2 EVM machines while 1 EVM machine installed in Dindori)

नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी २० मेस सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत मतदान होणार आहे. मतमोजणी ही ४ जूनला सकाळी आठपासून अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गुदामात होणार आहे. उमेदवारांना अधिकृतरीत्या चिन्ह मिळाल्यानंतर प्रचाराला सुरवात झाली.

दुसऱ्या बाजूने आता निवडणूक विभागाची मतदान घेण्यासाठी लगबग अन् तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी पी. एस. प्रद्युम्न (आयएएस), तर दिंडोरीसाठी बिनिता पेगू (आयएएस) हे मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून काम पाहतील.

मतदार केंद्र आणि मतदारसंख्या

मतदार संघ.........मतदार केंद्र.......मतदारसंख्या

नाशिक …..............१९१०...........२०,३०,१२४

दिंडोरी...................१९२२............१८,५३,३८७ (Latest Marathi News)

EVM machine
Nashik Lok Sabha Election : नाशिक, दिंडोरीत ‘तोफा’ धडाडणार; पंतप्रधानांची सभा 17 ला?

कर्मचारी संख्या

नाशिक - १६८ क्षेत्रीय अधिकारी आणि १२,६१८ कर्मचारी नियुक्ती करण्यात येणार आहे.

दिंडोरी - १८२ क्षेत्रीय अधिकारी आणि ११,७७६ कर्मचारी नियुक्ती करण्यात येणार आहे.

वाहाने - जिल्ह्याकरिता ५०९ एकूण बस लागणार आहे. १३७४ एकूण वाहनांची गरज पडणार आहे.

प्रत्येकी २२ भरारी पथके

नाशिक आणि दिंडोरीसाठी प्रत्येकी २२ भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. स्थायी पथके दिंडोरी ४४, तर नाशिकमध्ये ३८ आहेत. चलचित्र सर्वेक्षणासाठी प्रत्येकी १२, निरीक्षणासाठी प्रत्येकी ६ पथकांची नियुक्ती केली आहे. आंतरजिल्हा तपासणीसाठी दिंडोरीत ७ आणि नाशिकला ४ नाके आहेत. आंतरराज्य तपासणीचे दिंडोरी ४ आणि नाशिकमध्ये १ नाका आहे.

EVM machine
Nashik Lok Sabha Constituency : नाशिकमध्ये तिरंगी, तर दिंडोरीत दुरंगी लढत!लोकसभा निवडणुकीचे माघारीनंतर चित्र स्पष्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com