नाशिकचे 25 PSI झाले API; पोलिस महासंचालकांचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police inspectors promotion

नाशिकचे 25 PSI झाले API; पोलिस महासंचालकांचे आदेश

नाशिक : राज्यातील ८४६ पोलिस उपनिरिक्षकांना सहायक निरीक्षक पदावर बढती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर बुधवारी पोलिस महासंचालकांनी (DGP) आदेश काढले आहेत. या बढतीत नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील सहा तर नाशिक ग्रामीणच्या अठरा अशा एकुण २४ जणांना एपीआय म्हणूण पदोन्नती मिळाली आहे.

यांना मिळाली बढती

गृह विभागाने बढतीचे निर्देश जारी केल्यानंतर काल बुधवारी (ता.२३) पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी विविध भागातील एकूण ८४६ पोलिस उपनिरीक्षकांची पदोन्नती केली. नाशिक पोलिस आयुक्तालयातील अंकुश जाधव, राकेश शेवाळे, महेश हिरे, जयश्री अनवणे, आकाश शाही यांच्यासह महेश गायकवाड या पोलिस उपनिरिक्षकांना सहायक पोलिस निरिक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. याशिवाय नाशिक ग्रामीण पोलिस दलातील जयसिंग राजपूत, विठ्ठल चासकर, राहुल गवई, दिनेश सुर्यवंशी, तुषार साळुंखे, विलास घिसाडी, अजय कवडे, गोपाळ लावणे, मुकेश गुजर, आनंदा माळी, रामकृष्ण सोनावणे, दीपक बागूल, विनोद वसावे, गजानन राठोड, रामेश्वर घुगे, गणेश आखाडे, विवेक बैरागी आणि रुपचंद लालचंद शेले या अठरा जणांना सहाय्यक पोलिस निरिक्षक पदी पदोन्नती देण्यात आली आहे.

हेही वाचा: नाशिक जिल्ह्यात दीड लाख वीजग्राहकांना बारा कोटींची दंड व व्याजमाफी

तर पदोन्नती नाही

ज्या आधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल असेल, निलंबन, तसेच विभागीय चौकशी किंवा न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असेल किंवा ते एखादी शिक्षा भोगत असतील तर संबंधित घटक प्रमुखांनी त्यांना पदोन्नती न देता त्यांच्या विरुध्दच्या प्रकरणांची सविस्तर माहिती पोलिस महासंचालक कार्यालयाने ई-मेलव्दारे किंवा फॅक्सव्दारे तत्काळ मागविली आहे. त्यानंतर संबधितांच्या पुढील आदेशांची वाट पहावी, असे आदेशात म्हटले आहे.

हेही वाचा: नाशिक जिल्ह्यात मेडिकल दुकानावर महिन्यात लागणार सीसीटीव्ही

Web Title: Nashik 25 Psi Promoted As Api Order Of The Director General Of Police

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikpolicePromotion
go to top