NMC News : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 33 सिग्नल; महापालिका करणार व्यवस्थापन

NMC News : शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून ३३ सिग्नलचे व्यवस्थापन केले जाणार आहे.
signals
signals esakal

NMC News : शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून ३३ सिग्नलचे व्यवस्थापन केले जाणार आहे. त्यासाठी तीस लाख रुपये खर्च केले जाणार असून, एक वर्षाकरिता वेगवान दुरुस्तीचे कंत्राट दिले जाणार आहे.

स्मार्टसिटीच्या माध्यमातून २० सिग्नल बसविण्यात आले आहे. त्याचे व्यवस्थापन ठेकेदारामार्फत ‘डीएलपी’ मधून होणार आहे. (Nashik 33 signals to avoid traffic jams Management by municipality)

signals
Nashik ZP News : चारपेक्षा अधिक निविदांची फाइल आता निविदा समितीकडे : डॉ. अर्जुन गुंडे

शहराचा विस्तार वाढत असताना रस्त्यांची लांबीदेखील वाढत आहे. अनेक रस्त्यांवर चौक तयार होत असल्याने तेथे सिग्नलची आवश्यकता भासत आहे. महापालिकेच्या वतीने शहरात ३३ सिग्नल बसविण्यात आले आहे, तर स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत वीस सिग्नल बसविण्यात आले आहे.

तांत्रिक कारणामुळे सिग्नल यंत्रणा दुरुस्त होते. त्यातून वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे सिग्नल यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी ठेकेदार नियुक्त केला जाणार आहे.

त्या प्रस्तावाला नुकतीच महासभेने मान्यता दिली आहे. त्यानुसार ५३ पैकी ३३ सिग्नलचे व्यवस्थापन स्मार्टसिटीअंतर्गत केले जाणार आहे. (latest marathi news)

signals
Nashik Adivasi Morcha : अंमलबजावणीच्या खात्रीशिवाय माघार नाही; लाल वादळाचा मुक्काम वाढला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com