
Nashik Accidental Death News : महाविद्यालयीन युवतीचा अपघातात जागीच मृत्यू
वीरगाव (जि. नाशिक) : सटाणा येथे २२ वर्षीय महाविद्यालयीन युवतीचा अपघातात जागीच मृत्यू झाला असून देवळाने येथील अश्विनी हिरामण घोडे असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. (Nashik Accident Death News College girl died on spot in accident Nashik Latest Marathi News)
हेही वाचा: Nashik : फेम सिग्नलवर ट्रकच्या धडकेत मोपेडवरील महिला ठार
सटाणा महाविद्यालयात बी बी ए.चे शिक्षण नुकतेच पुर्ण केल्यावर पुढील शिक्षणासाठी लागणाऱ्या कागद पत्रांची पूर्तता करण्यासाठी सटाणा महाविद्यालयात सकाळी गेली होती. मात्र परत येत असताना सटाणा गावाजवळील आनंद लॉन जवळ मागून येणाऱ्या कौतिकपाडे येथील कांदा खाली करून आलेल्या ट्रॅक्टर च्या मागच्या चाकात युवतीचा तोल गेल्यामुळे तिचा अपघात झाला.तिला लगेच उपचारासाठी अपेक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र सदर युवती मृत झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.
हेही वाचा: Nashik Accident Spot : पंचवटीतील अनेक चौफुल्या बनल्या अपघातप्रवण