Nashik Accident Spot : पंचवटीतील अनेक चौफुल्या बनल्या अपघातप्रवण

accident
accidentesakal

नाशिक : पंचवटी परिसरातील अनेक चौफुल्या धोकादायक व अपघातप्रवण क्षेत्र झाल्याचे चित्र आहे. आज पहाटेच्या अपघाताने त्या अधिक धोकादायक बनल्याचे दिसून येते.

पंचवटीतील सर्वाधिक वर्दळीच्या काट्या मारुती मंदिराजवळील चौकात जुन्या आडगाव नाक्यावर पंचवटी कारंजा, हिरावाडी, नवीन आडगाव नाका, गणेशवाडी आदी ठिकाणचे रस्ते एकत्र येतात. या ठिकाणी पंचवटी पोलिस ठाण्याची काट्या मारुती पोलिस चौकी आहे. (Nashik Accident Spot Many four square in Panchavati became accident zone Nashik Latest Marathi News)

accident
Nashik Accident : कंडक्टर प्रवाशांना उठवायला मागे वळला अन्...; कंपनीचं स्पष्टीकरण

याठिकाणी सर्वच बाजूची वाहने भरधाव असतात. समोरच पोलिस चौकी असूनही बऱ्याचदा या ठिकाणी वाहतुकीची कोंडी तसेच वादावादीही होतात. या चौकात कायम लहान मोठे अपघात होत असतात. या ठिकाणी सिग्नल यंत्रणेबरोबरच दिवसभर वाहतूक शाखेच्या पोलिसाची गरज आहे. विशेष म्हणजे या परिसरात मोठ्याप्रमाणावर शाळा व महाविद्यालयेही आहेत.

आर.पी. विद्यालय, श्रीराम विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरही गतवर्षी अपघात होऊन आजीसोबत शाळेत जाणाऱ्या चिमुरड्याला जीव गमवावा लागला होता. या ठिकाणीही गतिरोधकाची गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे.

accident
Nashik Bus Accident : नाशिकमध्ये अग्नितांडव सुरूच; पुन्हा एक बस पेटली, Video Viral

औरंगाबाद नाक्यावरही चार पाच रस्ते एकत्र येतात. या ठिकाणीही गतिरोधकाची गेल्या कित्येक वर्षांची मागणी आहे. गणेशवाडातील आयुर्वेद सेवा संघाजवळील त्रिफुलीही अलीकडे अपघातप्रवण ठिकाण बनले आहे. याठिकाणी एका ज्येष्ठासह तरुणाला जीव गमवावा लागला आहे. याठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी स्थानिकांनी अनेकवेळा केली आहे.

दिंडोरी रोडवरील सिग्नल रामभरोसे

दिंडोरी रोडवर तारवाला नगर तसेच गोरक्षनगर, पेठरोडवरील शरदचंद्र पवार बाजार समितीजवळील चौफुल्यांवर वाहतूक शाखेचा कर्मचारी हजर नसल्याने अनेक वाहनधारक बिनदिक्कत सिग्नल नसतानाही वाहने नेतात. त्यामुळे लहानमोठे अपघात नित्याचेच झाले आहे. या ठिकाणीही दिवसभर वाहतूक पोलिसाची निकड आहे.

accident
Nashik Bus Fire: ''जाग आली अन् बघतो तर..."; बसमधील छोट्या आर्यनचा थरारक अनुभव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com