Nashik Accident News : टेम्पोच्या धडकेत महिला ठार! कारच्या धडकेत दोघे जखमी; शहरात हीट ॲन्ड रनच्या 2 घटना

Nashik News : पुणे, मुंबई पाठोपाठ नाशिकमध्ये हीट अॅन्ड रनची आठवडाभरात तिसरी घटना घडली आहे. डॉन बॉस्को शाळेसमोर भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत पादचारी महिला ठार झाल्याची घटना घडली.
Nashik Accident News
Nashik Accident Newsesakal

Nashik News : पुणे, मुंबई पाठोपाठ नाशिकमध्ये हीट अॅन्ड रनची आठवडाभरात तिसरी घटना घडली आहे. डॉन बॉस्को शाळेसमोर भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत पादचारी महिला ठार झाल्याची घटना घडली. भरदिवसा घडलेल्या अपघातानंतर संशयित चालक टेम्पोसह पसार झाला आहे. तर दुसऱ्या घटनेत कारने धडक दिल्याने बुलेटवरील दोघे जखमी झाले असून, सदर घटना कॉलेज रोड परिसरात घडली आहे. (Nashik Accident News)

या दोन्ही घटनांमध्ये चालकांनी अपघातानंतर वाहनांसह पोबारा केला आहे. पोलिस दोघा वाहनचालकांचा शोध घेत आहेत. निधी नीलेश वारे (४९, रा. गिरिराज अपार्टमेंट, कॉलेज रोड) असे अपघातामध्ये मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. पवन दीक्षित (रा. दीक्षित वाडा, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, सदर अपघाताची घटना रविवारी (ता. ७) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली होती.

निधी वारे या रविवारी सायंकाळी भाजीपाला खरेदी करण्यासाठी क्रोमा शोरूम ते डॉन बॉस्को शाळेच्या रस्त्याने पायी जात होत्या. त्या वेळी भरधाव टेम्पो (एमएच- १५- एचएच- २७२५) चालकाने निधी वारे यांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये निधी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्या जागीच ठार झाल्या.

अपघातानंतर संशयित टेंपोचालकाने घटनास्थळावर न थांबता पोबारा केला. याप्रकरणी सोमवारी (ता. ८) पहाटे सुमारास गंगापूर पोलिसात अपघातासह हीट ॲन्ड रनचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगापूर पोलिसांनी अपघातग्रस्त टेम्पोच्या क्रमांकावरून शोध घेत टेम्पो जप्त केला आहे. परंतु संशयित चालक पसार झाला आहे. सदर टेंपोवर तो चालक असल्याचे तपासातून समोर आले असून, टेम्पो एका कंपनीचा आहे. पसार झालेल्या संशयित चालकाचा पोलिस शोध घेत आहेत. (latest marathi news)

Nashik Accident News
Unnao Accident: स्लीपर बस टँकरला धडकली, 18 जण ठार; थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

दुसऱ्या घटनेत विसे मळ्यात हॉटेल महाराजा दरबारसमोर भरधाव कारने बुलेटला धडक देत दोघांना जखमी केले. मात्र अपघातानंतर संशयित कारचालकाने घटनास्थळावरून कारसह पोबारा केला. चेतन चव्हाण (रा. नामपूर, ता. सटाणा) यांच्या फिर्यादीनुसार, रविवारी (ता. ७) रात्री अकराच्या सुमारास चेतन व मित्र मयूर नंदन (रा. ताहाराबाद, ता. सटाणा) हे दोघे बुलेटवरून (एमएच- ४१- वाय- २६८५) कॅनडा कॉर्नरकडे येत होते.

त्या वेळी भरधाव कारने (एमएच- १५- एचवाय- २१९०) बुलेटच्या डाव्या बाजूने धडक दिली. अपघातामध्ये चेतन चव्हाण यांच्या डाव्या पायाचे मांडीचे हाड फॅक्चर झाले तर, डोक्याला दुखापत झाली. तसेच बुलेटस्वार मयूर यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तसेच, बुलेट आणि कारचेही नुकसान झाले.

मात्र, संशयित कारचालकाने घटनास्थळावरून पोबारा केला आहे. याप्रकरणी जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात अज्ञात कारचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार शिंदे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Nashik Accident News
Nashik Accident News : भरधाव कारने पादचारी महिलेला चिरडले! बारदान फाट्यावरील घटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com