Nashik : अमेरिकेहून २ दिवसांपूर्वीच परतलेला, मित्रांसोबत फिरायला गेल्यावर अपघात; २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Nashik Accident News नाशिकमध्ये मित्रांसोबत फिरायला गेल्यावर झालेल्या कार अपघातात २४ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. दोनच दिवसांपूर्वी तरुण अमेरिकेतून दोन वर्षांनी परतला होता.
Nashik crash claims life of young man

Nashik crash claims life of young man

Esakal

Updated on

नाशिकमधील नाशिक-गिरणारे मार्गावरील हॉटेल गंमत जंमतजवळ कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात २४ वर्षीय तरुण ठार, तर दोघे जखमी झाले. अपघातात ठार झालेला तरुण दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेहून परतला होता. हा अपघात शनिवारी (ता. ४) रात्री घडला. या प्रकरणी नाशिक तालुका पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे. शंतनू जयंत बुहऱ्हाडे (वय २४, रा. दीपज्योती, धनराजनगर, जेल रोड) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. Youth Dies in Nashik Accident

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com