Nashik Lok Sabha Election : ब्रह्मदेवच आठवावा, इतकी अनिश्चतता! कार्यकर्ते, पदाधिकारी अन् उमेदवारांनाही धाकधूक

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या निकालाची घटिका अगदी समीप येऊन ठेपली आहे.
Nashik Lok Sabha election
Nashik Lok Sabha electionesakal

Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या निकालाची घटिका अगदी समीप येऊन ठेपली आहे. केवळ चोवीस तासांवर राहिलेल्या या निकालाविषयी यंदा कुणीही ठामपणे सांगू शकत नाही, एवढी अनिश्चितता निर्माण झालेली दिसून येत आहे. निकालावर पैजा लावणारे गायब झाले असून, पदाधिकारी दूरच, नेतेही यंदा छातीठोकपणे विजयाविषयी सांगू शकत नाहीत. Activists officials and candidates are also intimidated in lok sabha election result )

म्हणूनच ‘ब्रह्मदेवसुद्धा सांगू शकणार नाही, की निवडणुकीचा निकाल काय लागेल तो’ या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याने तर त्यावर शिक्कामोर्तबच केले आहे. एकूणच निवडणुकीच्या निकालाबाबत निर्माण झालेली ही स्थिती खानदेशातील हॅट्‌ट्रिक करू पाहणाऱ्या आणि नवा इतिहास रचू पाहणाऱ्या सर्वच उमेदवारांसाठी चिंताजनक मानली जात आहे. यंदाची लोकसभा निवडणूक राज्यात पाच टप्प्यांत झाली. पहिल्या टप्प्यापासून मतदानाची टक्केवारी पाहून सारेच हबकून गेले.

निवडणूक ज्या मुद्द्यांभवती फिरेल, असे सत्ताधाऱ्यांना वाटत होते, तसे मात्र फारसे झालेले दिसले नाही. मतदानाचा टप्पा जसजसा पुढे जात राहिला तसतशी ही निवडणूक कधी लोकांनीच हाती घेतली हे सत्ताधाऱ्यांनाही समजले नाही. राष्ट्रीय मुद्यावर केंद्रित होणे अपक्षित असताना प्रथमच ही निवडणूक मोठ्या प्रमाणावर स्थानिक मुद्यांवर केंद्रित झाली आणि तेथूनच सत्ताधांऱ्यांचे गणित चुकत गेले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

मुळात या निवडणुकीत सर्वाधिक लोकांमध्ये चीड होती, ती राज्यात घडलेल्या सत्तांतर नाट्याची आणि तत्पूर्वी घडलेल्या पक्षफुटीची. त्यात भर पडली ती महागाई आणि शेतीमालाच्या भावाची. त्यामुळे एकूणच धाकधूक वाढली असून, त्यामुळेच गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत मिलालेली आघाडी टिकून राहील की काठावर नाव किनारी लागेल, याची चिंता उमेदवारांसह नेत्यांना लागून राहिली आहे. (latest marathi news)

Nashik Lok Sabha election
Nashik Lok Sabha Election : प्रत्येक मशिनचा नंबर उमेदवारांच्या मोबाईलवर; लोकसभा निवडणूक मतमोजणी

खानदेशाचा विचार केल्यास रावेरमधून रक्षा खडसे, नंदुरबारमधून डॉ. हीना गावित, धुळ्यातून डॉ. सुभाष भामरे आणि नाशिकमधून हेमंत गोडसे हे महायुतीचे उमेदवार तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात आहेत. डॉ. हीना यांना २०१४ मध्ये एक लाख सहा हजार, २०१९ मध्ये ९५ हजारांची आघाडी मिळाली होती. यंदा ही आघाडी किती वाढते की घटते, आणि त्या हॅट्‌ट्रिक साधणार का, याची उत्सुकता आहे.

रक्षा खडसे यांना २०१४ मध्ये तीन लाख १८ हजार, २०१९ मध्ये तीन लाख ३५ हजारांची भरभक्कम आघाडी मिळाली होती. यंदा त्यात काय मोठा बदल होणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे. धुळ्यातून डॉ. सुभाष भामरे यांना २०१४ मध्ये एक लाख ३० हजार, तर २०१९ मध्ये दोन लाख २९ हजारांची आघाडी मिळाली होती. यंदाची स्थिती पाहता ती कायम राहते की कसे, याविषयी चर्चा सुरू आहे. नाशिकमध्ये हेमंत गोडसेही तिसऱ्यांदा नशीब अजमावत आहेत.

त्यांना २०१४ मध्ये लाखाची आघाडी मिळाली होती, तर २०१९ मध्ये दोन लाख ९२ हजारांची आघाडी मिळाली होती. हे सर्व हॅट्‌ट्रिक करतात की आघाडी कमी होऊन विजयी पताका फडकवितात, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. दिंडोरी लोकसभेतील डॉ. भारती पवार दुसऱ्यांदा निवडणूक लढवीत आहेत. त्यांना गेल्या वेळी एक लाख ९८ हजारांची आघाडी मिळाली होती. तेव्हा मतविभाजनाचा त्यांना फायदा झाला होता. यंदा मात्र सरळ लढतीत मतदार कुणाला प्राधान्य देतात, याविषयी दिंडोरी मतदारसंघात उत्सुकता आहे.

Nashik Lok Sabha election
Nashik Lok Sabha Election : निकाल लोकसभेचा, मात्र धाकधूक वाढली आमदारांची

वेळ पहिलीच; पण चर्चा जोरात

महाविकास आघाडीतर्फे यंदा नंदुरबारमधून ॲड. गोवाल पाडवी, धुळ्यातून डॉ. शोभा बच्छाव (लोकसभा पहिलीच), जळगावमधून करण पवार, रावेरमधून उद्योजक श्रीराम पाटील, दिंडोरीतून शिक्षक भास्कर भगरे आणि नाशिकमधून राजाभाऊ वाजे पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत.

उमेदवारी लवकर जाहीर झाल्याने त्यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. मात्र लोकसभा मतदानाच्या टप्प्यानुसार बदलत गेलेल्या वातावरणात जनमत बऱ्यापैकी महाविकास आघाडीकडे झुकल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पदार्पणातच ते दिल्लीवारी करतात का, याविषयी चर्चा सुरू आहेत.

Nashik Lok Sabha election
Nashik Lok Sabha Election : निकाल लोकसभेचा, मात्र धाकधूक वाढली आमदारांची

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com