नाशिक- आदिवासी आयुक्तालयासमोर सुरू असलेल्या बिऱ्हाड आंदोलनाचा १७ वा दिवस उजाडला तरी त्यावर तोडगा निघालेला नाही. आंदोलकांनी १६ दिवसांत दहा क्विंटल तांदूळ संपविले. आतापर्यंत किराणा व भाजीपाल्यासाठी तब्बल ८६ हजार रुपये खर्च झाले आहेत. पुढील चार दिवस पुरेल एवढेच धान्य आता शिल्लक राहिले आहे.