Assembly Election : विधानसभेसाठी एकत्र लढावं की वेगळं? उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे विचारमंथन सुरू

Nashik News : लोकसभा निवडणुकीतील यशानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आगामी विधानसभेची तयारी सुरू केलेली आहे.
Shiv Sena leader Sanjay Raut while congratulating Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray MP Rajabhau Waje who was elected from Nashik.
Shiv Sena leader Sanjay Raut while congratulating Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray MP Rajabhau Waje who was elected from Nashik.esakal

Nashik News : लोकसभा निवडणुकीतील यशानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आगामी विधानसभेची तयारी सुरू केलेली आहे. आगामी निवडणुकीत राज्यातील चित्र आमूलाग्र बदलेले असणार आहे, यावर शिवसेनेच्या विचारमंथन बैठकीत एकमत झाल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. ‘गाव तेथे शाखा’ आणि ‘शाखा तेथे शिवसैनिक’ या ब्रीदवाक्याखाली शिवसेना मोहीम सुरू करणार असल्याचे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ठरले. (Assembly Election)

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पुढील विधानसभेची रणनीती काय असायला हवी? महाविकास आघाडीत एकत्र सामोरे जायचे की स्वतंत्र लढायचे, या मुद्द्यावर पदाधिकाऱ्यांना आगामी आठवड्यात अभ्यास करून मत मांडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भाजपची रणनीती कशी असेल याचा अंदाज घेऊन आडाखे बांधण्याचा शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचा विचार असल्याचे या बैठकीत स्पष्ट झाले.

भाजप २३ जागांवरून नऊवर, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष १८ जागांवरून नऊ जागांवर आला आहे. दोन्ही पक्षांचे मिळून २३ जागांचे नुकसान झाले आहे, तर काँग्रेस एका जागेवरून १४ जागांवर पोचली आहे. शिंदेंच्या शिवसेनेबरोबर जाऊन भाजपचे नुकसान, तर उद्धव ठाकरे यांच्या बरोबर जाऊन काँग्रेसचा फायदा झाला आहे.

राज्यात काँग्रेसकडे नेतृत्व नसल्याने ठाकरेंच्या आक्रमकपणाचा फायदा काँग्रेसला झाला. त्यामुळे आता पुढच्या समीकरणांचा आढावा घेण्यात येत आहे. कुठल्याही परिस्थितीत नियोजनात चूक राहता कामा नये, कुणीही गाफील राहू नये, अशा सूचनादेखील या बैठकीत देण्यात आल्या. (latest marathi news)

Shiv Sena leader Sanjay Raut while congratulating Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray MP Rajabhau Waje who was elected from Nashik.
Nashik News : तलाव भरल्याने दीड महिन्याचा प्रश्न मिटला; साठा वाढेपर्यत येवल्याला 5 दिवसाआड पाणी

नरेंद्र मोदी यांना धक्का देणे शक्य

इंडिया आघाडीच्या लोकसभेतील १६५ जागा केवळ दोन हजार मतांनी पडलेल्या आहेत, तर ७९ जागा अशा आहेत, ज्या अवघ्या हजार मतांनी पराभूत झाल्या आहेत. त्यामुळे मोदींना हरवणे शक्य असल्याचा स्पष्ट संदेश इंडिया आघाडीने दिला आहे. निधीची कमतरता, यंत्रणांचा ससेमिरा या सगळ्या त्रासातून इंडिया आघाडीने हा पल्ला गाठला आहे.

उद्धव ठाकरे यांचे चिन्ह गेले, पक्ष गेला. मात्र तरीही त्यातून त्यांनी नवा पक्ष उभा केला, हा मोठा संदेशही लोकांमध्ये गेला असल्यावर बैठकीत चिंतन झाले. नाशिकचा विचार करता महायुतीला गेल्या निवडणुकीत शहरातून दोन लाखांचा लीड होता. तो आता अवघ्या ३६ हजारांवर आला आहे. ही युतीची मोठी हार आहे. उद्धव ठाकरे संपले म्हणाणारे आता ‘उद्धव ठाकरे आगे बढो’ म्हणायला लागले आहेत, असेही एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

Shiv Sena leader Sanjay Raut while congratulating Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray MP Rajabhau Waje who was elected from Nashik.
Nashik Lok Sabha Election : शिवसेना (उबाठा) पक्षाला मुस्लिम, दलित मतांची साथ; उद्धव ठाकरे मराठी टक्का गमावत आहेत का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com