Nashik Agriculture: कृष्णनगरमध्ये नऊ एकरात 17 प्रकारची फळबाग! सेवानिवृत्त अप्पर विक्रीकर आयुक्त किसन डगळे यांचा यशस्वी प्रयोग

Nashik News : इगतपुरी तालुक्यातील विक्रीकर विभागाचे सेवानिवृत्त अप्पर विक्रीकर आयुक्त किसन डगळे यांनी माळरानावर नऊ एकरमध्ये विविध प्रकारच्या फळबागेची लागवड करीत उत्पन्नस्रोत मिळण्यासाठी शाश्वत शेतीचा मार्ग निवडला आहे
Rekha Dagle along with Retired Upper Sales Tax Commissioner Kisan Dagle showing seventeen types of orchard cultivation at Krishnanagar (Igatpuri).
Rekha Dagle along with Retired Upper Sales Tax Commissioner Kisan Dagle showing seventeen types of orchard cultivation at Krishnanagar (Igatpuri). esakal

इगतपुरी : इगतपुरी तालुक्यातील विक्रीकर विभागाचे सेवानिवृत्त अप्पर विक्रीकर आयुक्त किसन डगळे यांनी माळरानावर नऊ एकरमध्ये विविध प्रकारच्या फळबागेची लागवड करीत उत्पन्नस्रोत मिळण्यासाठी शाश्वत शेतीचा मार्ग निवडला आहे. यामध्ये केशर आंबा, दशहरी, आम्रपाली, तोतापुरी, लंगडा, चौसा, रत्ना पायरी, सुवर्ण रेखा, वनराज, हापूस, आंध्रा गणपल्ली, चेरुरसुला, चेरी पेढा, भामतारा आदी सतरा विविध आंब्याची लागवड केली आहे. या कामात त्यांची पत्नी रेखा डगळे यांची मदत होते. अद्रक, कोरफड, झेंडू, शेंदूरणी, जी नाईन, महालक्ष्मी केळी आदी पिके त्यांनी घेतले आहेत. (Nashik Agriculture 17 types of orchard in nine acres in Krishnanagar successful experiment by Kisan Dagle marathi news)

डगळे यांचे मूळ गाव सिन्नर तालुक्यातील सोनांबे असून वडील शेतकरी असल्याने लहानपणापासूनच त्यांना शेतीची आवड आहे. त्यांची घरची परिस्थिती हलाखीची होती. मोठ्या जिद्दीने विक्रीकर अधिकारी झालेल्या डगळे यांना सिन्नरच्या जी एमडी आर्ट्स कॉमर्स सायन्स महाविद्यालयातील प्राचार्य (कै.) ए.टी. बोंडे यांच्या मार्गदर्शनात अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

परिस्थितीवर मात करून अधिकारी झालेल्या डगळे यांनी सेवानिवृत्ती नंतर या मातीशी नाळ जुळवून आदर्श शेतीची यशोगाथा निर्माण केली आहे. फळबाग लागवडीचे अंतर बारा बाय दहा, बारा बाय सहा, बारा बाय बारा असे ठेवले असून प्रत्येक बांधावर हापूस, केशर, आम्रपाली तीस बाय तीस अंतर ठेवून लावले आहेत.

ठिबक सिंचनाचा उपयोग केला आहे. सतरा प्रकारच्या आंब्याच्या झाडांची उंची सहा फूट झाली असून मे महिन्यात काढणीला येतील, असे ते म्हणाले. गेल्यावर्षी आठ टन प्रमाणे अडीच लाख उत्पन्न झाले आहे. फळबाग लागवडीसाठी तीन फुटापर्यंत जमीन मातीचा थर पाहिजे नसेलतर खड्डे घेऊन माळरानाची लाल माती घेऊन लागवड करू शकतो. प्रत्येक बांधावर चिकू, रामफळ, सीताफळ, फणस, सरदार ४ नाईन पेरू लावले आहेत. बानावली नारळ, सफरचंद पण लावलेले आहेत. (latest marathi news)

Rekha Dagle along with Retired Upper Sales Tax Commissioner Kisan Dagle showing seventeen types of orchard cultivation at Krishnanagar (Igatpuri).
Nashik Agricultural Success: दुष्काळाशी 2 हात करीत फुलवली डाळिंबाची बाग! जळकू येथील शिंदे बंधुंचा प्रयोग यशस्वी

या कामात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके, तत्कालीन कृषी अधिकारी शीतलकुमार तंवर, शिवचरण कोकाटे, विनोद सांगळे, संतोष सातदिवे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभत आहे. त्यांची मुलगी डॉ. हर्षदा संघांनी रेडिओलॉजिस्ट तर मुलगा मयूर डगळे बी मॅकेनिकल व नूर मयूर डगळे सूनबाई आयआयएम असून सामाजिक बांधिलकी जोपासतात. त्यांनी ‘ठिगळ’ नावाचे आत्मचरित्र प्रसिद्ध केले आहे.

एकाच झाडावर पंचवीस प्रकारचे फळे मिळण्याचा प्रयोग

बागेत गावठी आंब्याची छाटणी करून आलेल्या फुटव्यांवर उपलब्ध असलेल्या पंचवीस जातींच्या आंब्याच्या काड्या घेऊन कलम केले. पुढील पाच सहा वर्षात एकाच झाडावर पंचवीस प्रकारच्या जातीची फळे दिसतील. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात एक झाड लावून त्या झाडाला जास्तीत जास्त फुटवे तयार करून या झाडांचे कलम करावेत. एकाच झाडांपासून पंचवीस प्रकारची फळे खायला मिळतील, असे डगळे यांनी सांगितले.

Rekha Dagle along with Retired Upper Sales Tax Commissioner Kisan Dagle showing seventeen types of orchard cultivation at Krishnanagar (Igatpuri).
Nashik Agricultural Success: परदेशवाडीतील पती-पत्नीने फुलवली नैसर्गिक मिश्रशेती! झाडे दांपत्यांचा यशस्वी प्रयोग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com