Nashik News : नाटक संपल्यानंतर व्यक्तिमत्त्वाला शोधण्याचा प्रयत्न; ‘अमृता साहिर इमरोज’ कलावंतांनी साधला संवाद

Nashik : महिला लेखिका म्हणून अनेकांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनावर टीका केली.
Actors Shambhu Patil, Sonali Patil, Harshada Kolhatkar from the Amrita Sahir Imroz play while speaking in the program 'Sakal Samvad'.
Actors Shambhu Patil, Sonali Patil, Harshada Kolhatkar from the Amrita Sahir Imroz play while speaking in the program 'Sakal Samvad'.esakal

Nashik News : १९६० साली पतीला सांगणे की, आपण एकमेकांसाठी नाहीये.. किती धाडसी निर्णय असेल! महिला लेखिका म्हणून अनेकांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनावर टीका केली. त्यांच्याबरोबर काम करायला नकार दिला, रेडियोत नोकरी करीत असताना अनेकांनी हेटाळणी केली. एवढा सर्व विरोध सहन करून कायम स्थिर असणारी स्त्री. नेमकी कशी असेल, आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हिएतनाम सारख्या देशाचा राष्ट्राध्यक्ष अमृता प्रीतम यांचा चाहता असणे हेच त्या बंडखोर लेखिकेचे खरे यश आहे. (nashik Amrita Sahir imroz drama artists interacted with sakal dr rahul ranalkar )

अमृता साहिर इमरोज नाट्यकृती संपल्यानंतर प्रेक्षक अमृता यांच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेत राहतात. त्यांना अधिकाधिक जाणून घेण्यासाठी त्यांचे साहित्य वाचायला सुरवात करतील, असे मत अमृता साहिर इमरोज नाटकाचे लेखक व कलाकार शंभु पाटील यांनी ‘सकाळ संवाद’ कार्यक्रमात उलगडून सांगितले. ‘सकाळ’ सातपूर कार्यालयात नाटकातील कलावंतांनी गुरुवारी (ता.१८) नाट्याचा इतिहास उलगडून दाखविला.

‘सकाळ’ उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांनी स्वागत केले. यावेळी नाटकातील कलावंत हर्षदा कोल्हटकर, सोनाली पाटील व शंभु पाटील उपस्थित होते. वॉव ग्रुपच्या अश्विनी न्याहारकर, संगीता मदन, मैथिली नाचणे, श्रीदेवी जाधव, मंजू सिंग, आशा पवार, जया कालगेंद्रे यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया व नाटकाचा संपूर्ण प्रवास जाणून घेण्यासाठी या संवादाचे आयोजन करण्यात आले होते. (latest marathi news)

Actors Shambhu Patil, Sonali Patil, Harshada Kolhatkar from the Amrita Sahir Imroz play while speaking in the program 'Sakal Samvad'.
Nashik News: चैत्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस प्रशासनाची यंत्रणा सज्ज! भाविक, व्यावसायिकांना खबरदारीच्या सूचना

आजही ग्रामीण भागातील महिलांची परिस्थिती बदललेली नसतांना त्या काळात अमृता प्रीतम यांनी एवढे कणखर निर्णय घेतले असल्याचे आश्चर्य वाटते. यावर पाटील सांगतात, प्रयोग संपल्यानंतर मुली विचारायला येतात आम्हाला इमरोज भेटेल काय, त्यावर त्यांना एकच उत्तर देतो तुम्ही अमृता झाल्याशिवाय तुम्हाला इमरोज भेटणार नाही.

भारत- पाकिस्तान देशातील नाते गढूळ करण्यात आले आहे पण, सज्ज्यासारखा अमृता यांचा पाकिस्तानी मित्र त्यांच्या कवितेत निराश जाणवल्यावर काळजीपोटी १५ दिवस भारतात येऊन राहिला. हे आकर्षण नाही, प्रेम आहे. प्रेमात अधिकार आला की प्रेमातील स्वातंत्र्य निघून जाते. अमृता प्रीतम यांनी प्रेम आणि स्वातंत्र्याचे परिपक्व नाते जपले. या कल्पना आणि वास्तवात ज्या जागा रिकाम्या दिसल्या त्या भरण्याचा प्रयत्न अमृता साहिर इमरोज नाटक लिहिण्याचा अनुभव पाटील यांनी कथन केला.

अमृता होणे सोपे नाही...

अमृता पात्राचा स्वातंत्र्य आणि स्वैराचार आवडला. घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी घ्यावी लागते, त्यासाठी खऱ्या आयुष्यात अमृता होणे सोपे नाही. माझ्यासाठी तसा विचारही करणे शक्य नाही. वास्तविक हे माझे पहिले नाटक आहे. कधी अभिनयाचे शिक्षण घेतले नाही. सुरवातीला प्रयोग करताना दोन तास त्या पात्रात स्वतःला बघणे अवघड जात होते, पण कालांतराने अभिनयात ती सहजता यायला लागल्याचे हर्षदा कोल्हटकर यांनी सांगितले.

Actors Shambhu Patil, Sonali Patil, Harshada Kolhatkar from the Amrita Sahir Imroz play while speaking in the program 'Sakal Samvad'.
Nashik News : दुष्काळी उपाययोजनांना आदेशाचा अडसर; 93 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com