Nashik News : दिंडोरीचा हट्ट तर, नाशिक लोकसभेसाठी काँग्रेस आग्रही...

Nashik and Dindori Lok Sabha constituencies held by NCP in MVA were claimed by District Congress nashik news
Nashik and Dindori Lok Sabha constituencies held by NCP in MVA were claimed by District Congress nashik newsesakal

Nashik News : महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघावर जिल्हा काँग्रेसने दावा ठोकला आहे.

दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादीला तीनदा लढवून यश मिळत नसल्याने यंदा हा मतदारसंघ काँग्रेसलाच घ्या, असा हट्ट यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला. (Nashik and Dindori Lok Sabha constituencies held by NCP in MVA were claimed by District Congress nashik news)

तर, पक्षाची ताकद वाढविण्यासाठी नाशिक लोकसभा मतदारसंघ लढविला गेला पाहिजे, अशी भूमिका मांडत, हा मतदारसंघ काँग्रेसकडे घेण्यात यावा, अशी मागणी यावेळी झाली. धुळे लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत पक्षाने धुळे जिल्ह्याला संधी दिली मात्र आगामी लोकसभेसाठी मालेगावातूनच उमेदवार दिल्यास विजयी होणार असल्याचा दावा जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला.

मुंबईत प्रदेश काँग्रेसकडून लोकसभानिहाय मतदारसंघाचा आढावा सुरू आहे. यात नाशिक, दिंडोरी व धुळे लोकसभा मतदारसंघाचा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, माजीमंत्री बाळासाहेब थोरात, सतेज पाटील आदींनी आढावा घेतला. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील बहुतांश विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याने हा मतदारसंघात राष्ट्रवादीकडे आहे.

मात्र, सन २००९ पासून या मतदारसंघावर राष्ट्रवादीला विजय मिळविता आलेला नसल्याचे यावेळी निर्दशनास आणून देण्यात आले. त्यामुळे यंदा हा मतदारसंघ काँग्रेसकडे घेण्याचा हट्ट पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला. त्याचवेळी मतदारसंघासाठी उमेदवार कोण अशी विचारणा करण्यात आली असता, आदिवासी क्षेत्रातून सक्षम अन नवीन चेहऱ्यात उमेदवारी देता येईल, असे सांगण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nashik and Dindori Lok Sabha constituencies held by NCP in MVA were claimed by District Congress nashik news
Nashik Sanjay Raut : त्र्यंबकेश्‍वरची शांतता अबाधित राहावयास हवी : संजय राऊत

नाशिक लोकसभा मतदारसंघातही राष्ट्रवादीला २०१४ व २०१९ मध्ये यश मिळालेले नाही. त्यामुळे हा मतदारसंघ पक्षाकडे घेण्याचा आग्रह करण्यात आला. त्यावेळी मतदारसंघातून उमेदवार कोण? अशी विचारणा झाली असता पदाधिकाऱ्यांना मतदारसंघ घ्या उमेदवार एकत्रितपणे ठरवू असे सांगण्यात आले. मात्र, उमेदवारी न केल्यास पक्ष संघटन कसे वाढणार असा प्रश्न जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे यांनी केला.

पक्षाचे उमेदवार असल्यास, घरोघरी पक्ष व चिन्ह पोहचता येते. पक्षवाढीसाठी आम्हाला ताकद मिळेल. दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असल्यामुळे पक्षाचे संघटन होण्यास अडसर येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यासाठी पक्ष संघटन वाढावे याकरिता मतदारसंघ पक्षाला मिळावे, अशी मागणी प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, रमेश कहांडोळे यांनी बैठकीत केली.

बैठकीस आमदार हिरामण खोसकर, शहराध्यक्ष अॅड. आकाश छाजेड, शरद आहेर, डॉ. शोभा बच्छाव, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, गुणवंत होळकर, अॅड. संदीप गुळवे, वत्सला खैरे, स्वाती जाधव, स्वप्नील पाटील, अनिल पाटील, किशोर कदम यांसह तालुकाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.

Nashik and Dindori Lok Sabha constituencies held by NCP in MVA were claimed by District Congress nashik news
Nashik Rain Update : शिर्डी सुरत महामार्गावर बाभळीचे झाड पडले उन्मळून; वाहतूक ठप्प

थोरात यांनी उमेदवारी करावी

नाशिक लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे घ्यावा अशी मागणी झाल्यानंतर उमेदवार कोण अशी विचारणा प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी केली. त्यावेळी स्थानिक नावे घेण्यात आली. मात्र, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी उमेदवारी करावी अशी मागणी माजी आमदार कोतवाल यांनी केली.

थोरात यांचे नाशिक जिल्ह्यांशी चांगले स्नेहसंबंध असून, त्यांचा मतदारसंघ शेजारीच असल्याने मोठा फायदा पक्षाला होईल असे त्यांनी सांगितले. त्यामुळे थोरात यांचे पुन्हा नाशिक लोकसभेसाठी चर्चेत आले आहे.

धुळे मतदारसंघासाठी मालेगावातून उमेदवारी

धुळे लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देताना आतापर्यंत धुळे जिल्ह्याला प्राधान्य दिलेले आहे. परंतू, यश मिळाले नाही. यंदा मालेगावातून उमेदवारी द्यावी, अशी मागणी बैठकीत झाली.

धुळ्यासाठी आमदार कुणाल पाटील, डॉ. तुषार शेवाळे, शाम सनेर यांची नावे पुढे आली. त्यावेळी आमदार पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार दिला. त्यामुळे शेवाळे यांना उमेदवारी देण्याची आग्रही मागणी पदाधिका-यांनी लावून धरली.

Nashik and Dindori Lok Sabha constituencies held by NCP in MVA were claimed by District Congress nashik news
Success Story : आदित्‍य होणार ‘NDA’ मध्ये दाखल; जिद्द, चिकाटीच्‍या जोरावर मिळविले यश!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com