Nashik News : नाशिक शहराला आणखी एक सहायक पोलिस आयुक्त

Nashik News : गृह विभागाने सोमवारी (ता.८) महाराष्ट्र पोलिस दलातील सहायक आयुक्त तथा उपअधीक्षकांच्या बदल्या केल्या. यात शहर पोलिस आयुक्तालयात आणखी एक पोलिस आयुक्त मिळाले आहेत.
Nashik Police Commissioner Office
Nashik Police Commissioner Officeesakal

नाशिक : गृह विभागाने सोमवारी (ता.८) महाराष्ट्र पोलिस दलातील सहायक आयुक्त तथा उपअधीक्षकांच्या बदल्या केल्या. यात शहर पोलिस आयुक्तालयात आणखी एक पोलिस आयुक्त मिळाले आहेत. गेल्याच आठवड्यात पोलिस दलातील ६८ सहायक आयुक्तांच्या बदल्या केल्या होत्या. ( Another Assistant Commissioner of Police for Nashik City)

त्यात तीन महिला अधिकाऱ्यांची नाशिक शहर सहायक आयुक्तपदी बदली झाली. तर सोमवारी (ता. ८) सायंकाळी गृह विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार नाशिकमध्ये आणखी एक सहायक आयुक्त नियुक्त केले.

मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलिस अधीक्षक सुधाकर चंद्रभान सुराडकर यांची नाशिक शहरात सहायक आयुक्तपदी नियुक्ती झाली. (latest marathi news)

Nashik Police Commissioner Office
Nashik Railway : सलग दुसऱ्या दिवशी ‘पंचवटी’सह अनेक गाड्या रद्द! नाशिकच्या प्रवाशांचे हाल

यामुळे वाहतूक शाखेला स्वतंत्र सहायक आयुक्त लाभणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून प्रशासन सहायक आयुक्तांकडे वाहतूक शाखेचा अतिरिक्त पदभार राहिला आहे.

तसेच, नाशिक ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेचे उपअधीक्षक धन्यकुमार चांगदेव गोडसे यांची पुणे शहरात सहायक आयुक्तपदी नियुक्ती झाली.

Nashik Police Commissioner Office
Nashik News : आयुक्तालयातील प्रभारींवर ‘खांदेपालटा’ची टांगती तलवार; सहायक आयुक्तांमध्ये फेरबदलाची चर्चा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com